शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचाराविरोधात आजी-माजी विद्यार्थ्यांनी काढला आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 15:34 IST

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी विद्यापीठातील आजी माजी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय इमारतीवर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी कुलगुरूंची खुर्ची गेटजवळ आणून त्यास हार घालून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देविद्यापीठातील परीक्षा विभागात भ्रष्टाचार झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे

परभणी,दि.१० : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी विद्यापीठातील आजी माजी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय इमारतीवर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी कुलगुरूंची खुर्ची गेटजवळ आणून त्यास हार घालून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.

विद्यापीठातील परीक्षा विभागात भ्रष्टाचार झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. भ्रष्टाचारामुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. या पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला. दोषी अधिकारी निलंबित झालेच पाहिजेत अशा घोषणा देत मोर्चाला सुरुवात विद्यापीठातील कृषी महाविद्यालयापासून सुरुवात झाली. मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते. मोर्चा प्रशासकीय इमारत परिसरात पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी कुलुगुरूंची खुर्ची बाहेर आणून त्यास हार घालून आपला रोष व्यक्त केला. दोन तास हे आंदोलन करण्यात आले.

परीक्षा विभागातील उपकुलसचिव यांच्या वरदहस्ताने विद्यापीठात अंदाधुंद कारभार सुरू आहे. विद्यार्थ्यांचे गुण वाढविणे , उत्तरपत्रिका घरपोच पोहचविणे, जाणून बुजून निकाल उशिरा लावणे असे प्रकार येथे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. यामुळे परीक्षा विभागाच्या उपकुलसचिवांना निलंबित करावे, परीक्षा विभागातील काही कर्मचाऱ्यांनी खाजगी दलाल लावले आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्यांशी संपर्क करून तडजोड केली जाते , अशा  दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, उत्तरपत्रिका फेर तपासणीची फी १०० रुपायांऐवजी १० रुपय करावी,  परीक्षा विभागास सर्व सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात , सर्व विषयाचे ऑनलाईन निकाल घोषित करावेत आदी मागण्या करण्यात आल्या. महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ आजी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ओंप्रकाशसिंह सिसोदिया, अनिल आढे, सुनील बागल, राजेंद्र लोणे, विजय सावंत, शरद हिवाळे, गौतम भालेराव आदीं पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.