शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शेतीचा नांगर रोबोटच्या खांद्यावर; १८ कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 02:43 IST

परभणी कृषी विद्यापीठात प्रशिक्षण प्रकल्प

प्रसाद आर्वीकर 

परभणी : हवामानातील बदल, वारंवार येणारा दुष्काळ, मजुरांचा प्रश्न या परिस्थितीवर मात करण्यासाठी आता आपली शेती रोबोटच्याच हवाली केली जाणार आहे. त्यासाठीचा प्रशिक्षण प्रकल्प उभारण्यास येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास भारतीय कृषी संशोधन परिषदेने मंजुरी दिली आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचा देशातील हा एकमेव प्रशिक्षण प्रकल्प असेल. तीन वर्षांच्या या प्रकल्पासाठी १८ कोटींचा निधी परिषदेने मंजूर केला आहे़ या प्रकल्पाची प्राथमिक संकल्पना प्रमुख शास्त्रज्ञ डॉ़ गोपाळ शिंदे यांची असून, समन्वयक डॉ़ राजेश कदम आहेत.

यंत्र मानव (रोबोट), ड्रोन, स्वयंचलित डिजीटल साधनांचा समावेश असणाऱ्या विविध संशोधन प्रयोगशाळा निर्माण करून विद्यार्थी व संशोधक प्राध्यापकांना या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे़ कौशल्यप्राप्त प्रशिक्षणार्थी डिजीटल शेतीचे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत नेतील.कृषी विद्यापीठाने अ‍ॅग्री रोबोट, अ‍ॅग्री ड्रोन्स व अ‍ॅग्री स्वयंचलित यंत्राच्या देवाण-घेवाणीसाठी अमेरिकेतील वॉशिग्टन स्टेट युनिव्हर्सिटी तसेच स्पेन, युक्रेन व बेल्लारुस येथील विद्यापीठांशी करार केला आहे़ पवई व खरगपूर येथील आयआयटीचे नॉलेजसेंटर म्हणूनही सहकार्य लाभणार आहे़

शेतीच्या वाढत्या समस्यांवर डिजीटल तंत्रज्ञानाच्या आधारे मात करणे शक्य आहे़ स्वयंचलित वाहनाद्वारे पीकहाताळणी, रोगनिदान व उपाय, काढणी व वाहतूक करणे शक्य होईल़ ड्रोनद्वारे कार्यक्षमरित्या पीक पाहणी व निरीक्षण, जमिनीतील शुष्कता, पिकांवरील रोग वनिदान, कीटकनाशकांची फवारणी हे कॅमेरा व सेंसर तंत्रज्ञानाद्वारे शक्य होईल़ या तंत्रज्ञानाद्वारे आवश्यक ती मनुष्यबळ निर्मिती करून रोजगार व स्वयंरोजगार संधी निर्माण केल्या जातील, असे कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरी