शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर 3 हजार अंगणवाडी सेविका, मदतनिसांना भाऊबीज भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 15:40 IST

कोरोनाच्या संकट काळात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी जिल्ह्यात प्रभावी भूमिका बजावली.

ठळक मुद्देमहिला व बालकल्याण विभागाकडून ६२ लाख रुपयांचे जिल्ह्यात वितरण 

परभणी : जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना प्रत्येकी २ हजार रुपये, या प्रमाणे ६२ लाख ८० हजार रुपयांची भाऊबीज भेट वितरित करण्यात आली आहे. 

कोरोनाच्या संकट काळात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी जिल्ह्यात प्रभावी भूमिका बजावली. त्यामुळे राज्य शासनाने अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट देण्याचा निर्णय घेतला होता. शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाला ६२ लाख ८० हजारांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून सर्व अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रुपये या प्रमाणे निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जवळपास सर्वच अंगणवाडी सेविकांच्या खात्यात निधी जमा झाला आहे. 

ग्रामीण भागात विविध कामे करणाऱ्या अंगणवाडी सेविका शासनाच्या योजना नागरिकांपयर्यंत पोहचविणाऱ्या दुवा ठरत आहेत. बालविकास विभागात बालकांचे पोषण, लसीकरण या कामांमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. या कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने दिवाळी भाऊबीज भेट देण्याचे जाहीर केले. त्यानंतर हा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. दोन दिवसांपासून सर्व अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर निधी जमा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. 

६२ लाख ८० हजार रुपयांचा निधी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी भेट म्हणून प्रत्येकी २ हजार रुपये या प्रमाणे महिला बालविकास विभागाला ६२ लाख ८० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. अंगणवाडी सेविकांनी कोरोनाच्या संकटकाळात बजावलेली कामगिरी लक्षात घेवून महिला व बालविकास विभागाने निधी प्राप्त होताच तो अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या दोन दिवसांत सर्वांच्या खात्यावर निधी जमा होणार आहे.

प्रोत्साहन मदतकोरोनाच्या काळात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे अंगणवाडीताईंना प्रोत्साहन मदत म्हणून हा निधी मिळाला आहे. त्यानुसार अंगणवाडीताईंच्या खात्यावर रक्कम वितरित केली जात आहे. - शोभाताई घाटगे, सभापती

भाऊबीज भेट निधीशासनाकडून प्राप्त झालेला भाऊबीज भेट निधी सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आला आहे. अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर लवकरात लवकर निधी जमा करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.  - डॉ. कैलास घाेडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. परभणी

टॅग्स :fundsनिधीparabhaniपरभणी