शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाय मुरगळल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल; इंजेक्शन देताच रुग्णाच्या तोंडाला फेस अन् मृत्यू

By मारोती जुंबडे | Updated: October 6, 2023 09:42 IST

परभणी येथील घटना; अस्थिव्यंग विभागात सुरू होते उपचार

परभणी: पाय मुरगळल्याने जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात उपचारासाठी दाखल असलेल्या ४० वर्षीय रुग्णाला डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. या इंजेक्शननंतर रुग्णाच्या तोंडाला फेस येऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश करत आपला संताप व्यक्त केला.

 परभणी शहरातील साखला प्लॉट भागातील भारत मोरे (४०) हे आपला पाय मुरगळला म्हणून जिल्हा रुग्णालयातील अस्थिव्यंग विभागात ३ ऑक्टोंबर रोजी उपचारासाठी दाखल झाले होते. मोरे यांना डॉक्टरांनी दाखल करून ५ ऑक्टोबर रोजी आपल्या पायावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर डॉक्टरांनी आपला उपचार सुरू केला. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी मोरे यांना डॉक्टरांनी औषधी व इंजेक्शन दिले. मात्र त्यानंतर भारत मोरे यांच्या तोंडाला फेस येऊन त्यांना त्रास सुरू झाला. या रुग्णाची गंभीरता पाहून डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयू विभागात पुढील उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारानंतर ५ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर नातेवाईकांनी आक्रोश करत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. या घटनेने जिल्हा रुग्णालय परिसरात खळबळ उडाली आहे.

रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्हनांदेड येथील शासकीय रुग्णालयातील मृत्यूच्या तांडवानंतर परभणी जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय जाधव यांनीही बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयातील रुग्णांवर होत असलेल्या उपचारांची माहिती घेत आढावा घेतला होता. त्याचबरोबर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे हे सुद्धा शुक्रवारी दुपारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयाची पाहणी करून प्रशासनाला योग्य ते सूचना देणार आहेत. मात्र शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भारत मोरे यांचा झालेला मृत्यू रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला आहे.

"भारत मोरे यांच्यावर अस्थिव्यंग रुग्णालयात योग्य ते उपचार सुरू होते. रुटीन डोस दिल्यानंतर त्यांच्या तोंडाला फेस येऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना आमच्यासाठी ही चॅलेंजिंग आहे.- डॉ. जयश्री यादव, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक परभणी.

"डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर रुग्णाच्या तोंडाला फेस येऊन त्रास सुरू झाला. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे माझे पती मला गमवावे लागले.-कल्पना भारत मोरे, पत्नी

टॅग्स :hospitalहॉस्पिटलparabhaniपरभणीDeathमृत्यू