शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद ! परसबागेतून राबविला जातोय सेंद्रीय शेतीचा प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 19:22 IST

पोषण आहाराचा स्तर वाढविण्यासाठी होणार फायदा

ठळक मुद्दे उजळंबा ग्रामस्थांचा पुढाकार 

परभणी : तालुक्यातील उजळंबा येथे विवेकानंद सेवाभावी संस्था व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनज्योती अभियानांतर्गत परसबागेच्या माध्यमातून पोषणाचा स्तर वाढविण्यासाठी सेंद्रीय शेती सुरु करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र ग्रामीण जीवनज्योती अभियान (उमेद) अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून परभणी तालुक्यातील उजळंबा येथे परसबाग तयार करण्यात आली आहे. या परसबागेमध्ये औषधी वनस्पती, पालेभाज्यांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये पूर्णत: नैसर्गिक पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. रासायनिक खताला फाटा देत, शेण खत व गांडुळ खताचा वापर करीत हा भाजीपाला पिकवला जाणार आहे. नुकतेच या प्रकल्पाचे समन्वयक विक्रम मोरे, संदीप भोजने, प्रा.विलास साखरे यांनी उजळंबा  येथील माधवराव साखरे यांच्या शेतात हा प्रयोग केला. या माध्यमातून महिला, गरोदर महिला, किशोरवयीन मुली, लहान मुुले यांच्या जीवनामध्ये सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्याचा वापर वाढावा, यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे प्रकल्प समन्वयकांनी सांगितले.

बालकांसाठी लाभउजळंबा येथे परसबागेअंतर्गत सेंद्रीय पद्धतीने पिकविल्या जाणाऱ्या टोमॅटे, वांगे, कारले यासह फळ भाजीपाला ग्रामस्थांबरोबरच बालकांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे परसबागेतून सेंद्रीय शेतीचा राबविला जाणारा उपक्रम भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. शासनाच्या वतीने हा प्रकल्प राबविण्यात येणार असून उमेद अंतर्गत या प्रकल्पाची देखरेख करण्यात येत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीparabhaniपरभणी