शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात कालव्यांच्या दुरुस्तीला प्रशासनाने दिला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:08 IST

जिल्ह्यात जायकवाडी डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला प्रशासनाने फाटा दिल्यामुळे सिंचनात अडथळे निर्माण होणार असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त केला जात आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात जायकवाडी डाव्या कालव्याच्या दुरुस्तीला प्रशासनाने फाटा दिल्यामुळे सिंचनात अडथळे निर्माण होणार असल्याने शेतकºयांमधून रोष व्यक्त केला जात आहे़पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा परभणी जिल्ह्यातून गेला आहे़ पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा तालुक्यात या कालव्याच्या सहाय्याने शेतीचे सिंचन केले जाते़ कालव्याची जागोजागी दुरवस्था झाली आहे़ अनेक ठिकाणी फरशी उखडली असून, कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे़ तसेच झुडपेही वाढले आहेत़ या कालव्यात अनेक ठिकाणी उपवितरिका असून, या वितरिकांमध्ये मागील काही वर्षांपासून पाणी वाहिले नसल्याने त्या बुजून गेल्या आहेत़ परिणामी कालव्यातून सोडलेले पाणी वितरिकांमधून टेलपर्यंत पोहचत नाही आणि सिंचनात अडथळे निर्माण होतात़ यावर्षी जायकवाडी प्रकल्पात पाणी उपलब्ध असल्याने हे पाणी परभणी जिल्ह्यासाठी मिळणार हे नक्की होते़ त्यामुळे पाणी सोडण्यापूर्वी वितरिकांची दुरुस्ती करणे अपेक्षित होते़ मात्र पाटबंधारे विभागाने या दुरुस्तीलाच फाटा दिला आहे़ रबी हंगामासाठी कालव्यातून पाणी सोडले जात असून, दुरुस्ती केली नसल्याने हे पाणी शेतकºयांना मुबलक प्रमाणात उपलब्ध मिळण्याबद्दल शंका निर्माण झाली आहे़विशेष म्हणजे, जायकवाडी प्रकल्पातून यावर्षी आठ पाणी पाळ्या द्याव्यात, अशी मागणी होत आहे़ परंतु, कालवेच खराब असतील तर जायकवाडीचे पाणी शेतकºयांपर्यंत पोहचेल कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे़