शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

परभणी जिल्हा रुग्णालयात दीडशे खाटांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:55 IST

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी नवीन १५० खाटा दाखल झाल्याने अनेक वर्षांपासूनची रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. जिल्हा रुग्णालयात निर्माण झालेली खाटांची समस्या लक्षात घेऊन शल्य चिकित्सक डॉ.जावेद अथर यांनी ही मागणी नोंदविली होती.

ठळक मुद्देरुग्णांची गैरसोय होणार दूरजिल्हा शल्यचिकित्सकांचा पाठपुरावा

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सोमवारी नवीन १५० खाटा दाखल झाल्याने अनेक वर्षांपासूनची रुग्णांची गैरसोय दूर होणार आहे. जिल्हा रुग्णालयात निर्माण झालेली खाटांची समस्या लक्षात घेऊन शल्य चिकित्सक डॉ.जावेद अथर यांनी ही मागणी नोंदविली होती.परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज १००० ते १२०० रुग्ण उपचारासाठी येतात. त्यातून जवळपास ३०० रुग्ण आंतररुग्ण विभागामध्ये दाखल होतात. या रुग्णालयामध्ये सामान्य रुग्णालय, अस्थीव्यंग विभाग व स्त्री रुग्णालय असे तीन विभाग आहेत. या विभागांतर्गत इतर उपविभाग चालविले जातात. पावसाळ्यामध्ये संसर्गजन्य आजाराने अनेक नागरिक त्रस्त असतात. हे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आल्यानंतर रुग्णालयातील बेड (खाटा) अपुऱ्या पडतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला नाईलाजास्तव दोन ते तीन रुग्णांना एकाच बेडवर उपचार द्यावे लागतात.जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या ५१६ बेड उपलब्ध आहेत. सामान्य रुग्णालयाला ४०६, स्त्री रुग्णालयात ६० तर अस्थीरोग विभागात ५० अशी बेडची विभागणी केली आहे. त्यामुळे ५१६ पेक्षा अधिक रुग्ण दाखल झाल्यानंतर सामान्य रुग्णालय प्रशासनाला रुग्णांवर उपचार करताना कसरत करावी लागत असे. ही समस्या लक्षात घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अथर यांनी वरिष्ठस्तरावर बेडची मागणी केली होती. त्यानुसार ९ जुलै रोजी सकाळी १० वाजता दीडशे बेड मिळाले आहेत. त्यामुळे आता रुग्णालयामध्ये ६६६ बेड उपलब्ध झाले असून, उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे.---या विभागांना मिळाले नवीन खाटसोमवारी जिल्हा रुग्णालयाला दीडशे नवीन खाट मिळाले आहेत. ज्या विभागामध्ये खाटांची कमतरता आहे, त्या ठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी विभागनी करुन खाटांचे वाटप केले आहे. यामध्ये स्त्री रुग्णालयाला ४०, संसर्गजन्य वॉर्डला २५, अस्थीव्यंग विभागाला १०, पुरुष सर्जरी विभाग २०, पुरुष वॉर्ड ३० तर महिला कक्षाला २५ खाटा दिल्या जातील, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने दिली.---‘लोकमत’ने केला होता पाठपुरावायेथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षामध्ये १९ खाट उपलब्ध आहेत. मात्र रुग्णांची संख्या अधिक आहे. या संदर्भात १९ जून रोजी ‘लोकमत’ने ‘१९ खाटांवर ४५ रुग्ण’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. तसेच खाटांची संख्या कमी असल्याने रुग्णांची होणारी होरपळ या वृत्तात मांडली होती. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने पावले उचलत ९ जुलै रोजी दीडशे खाट उपलब्ध करुन घेतले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीParabhani civil hospitalजिल्हा रुग्णालय परभणी