शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

''अब की बार, पेट्रोल 'नव्वदी' पार'' परभणीत पेट्रोलच्या किंमतीने गाठला उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 14:23 IST

परभणीमध्ये पेट्रोलच्या दराने नव्वदी गाठली असून शहरात पेट्रोल ९०.१६ तर डीझेल ७८.०६ रुपये प्रती लिटर घ्यावे लागत आहे. 

औरंगाबाद/परभणी : देशभरात इंधन दराच्या वाढत्या दराने नागरिक त्रस्त आहेत. या विरोधात काल झालेल्या भारत बंद नंतरही आज पुन्हा पेट्रोलच्या दरात १४ ची तर डिझेलच्या दरांमध्येही १५ पैशांची वाढ झाली आहे. यामुळे परभणीमध्येपेट्रोलच्या दराने नव्वदी गाठली असून शहरात पेट्रोल ९०.१६ तर डीझेल ७८.०६ रुपये प्रती लिटर घ्यावे लागत आहे. 

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून, या दरवाढीचा सर्वाधिक फटका येथील वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या इतर वस्तूंचेही भाव वाढत आहेत. परभणी जिल्ह्यातच पेट्रोल आणि डिझेलचे दर एवढे जास्त का? याचा आढावा घेतला असता तेलडेपोंचे अंतरच दरवाढीसाठी कारणीभूत ठरल्याची बाब समोर आली.

परभणी जिल्ह्यात मनमाड आणि सोलापूर येथून पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होतो. दोन्ही तेलडेपोंचे अंतर जिल्ह्यापासून साधारणत: ३०० कि.मी. पेक्षा अधिक आहे. इंधन पुरवठा करताना इंधनाच्या मूळ किंमतीमध्ये व्हॅट, राज्य शासनाचा कर आणि वाहतूक खर्च लावला जातो. मूळ किंमतीवर ३९.८ टक्के व्हॅट आणि २.४० रुपये प्रति लिटर प्रति किलोमीटर या प्रमाणे वाहतूक खर्च लावला जाते. ३०० कि.मी. अंतराच्या आत एकही तेलडेपो नसल्याने जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचे भाव सर्वाधिक झाले आहेत. त्यामुळे तेलडेपोंचे अंतरच परभणी जिल्ह्याच्या मुळावर उठले आहे. देशभरात दरवाढीच्या झळा बसत असल्या तरी परभणीत त्याची तीव्रता अधिक आहे. यामुळे परभणीकर त्रस्त झाले आहेत. 

परभणीला मंजूर झाला होता तेलडेपोराज्याच्या भौगोलिक क्षेत्राचा विचार करता परभणी जिल्हा हा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने १५ वर्षांपूर्वी परभणी तालुक्यातील पेडगाव येथे तेलडेपो उभारण्यास मंजुरी मिळाली होती. मुंबईपासून ते परभणीपर्यंत पाईपलाईनद्वारे तेल पोहोचती करणे आणि परभणीतून इतर जिल्ह्यांना तेल पुरवठा करण्याचा हा प्रकल्प होता. परंतु राजकीय उदासिनतेमुळे हा प्रकल्प परभणीत होऊ शकला नाही. अखेर परभणी ऐवजी मनमाड येथे हा तेलडेपो उभारण्यात आला. 

बंदचा झाला नाही परिणाम

इंधन दरवाढीविरोधात काल काँग्रेसनं भारत बंदची हाक दिली होती. या बंदला 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. या बंदला देशभरातून प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. राज्यातही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन मोदी सरकारचा निषेध केला. देशभरातील भारत बंदचा जोर पाहून केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेत सर्वसामान्य जनतेच्या त्रासाची आपल्याला कल्पना असल्याचं म्हटलं. मात्र पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणं सरकारच्या हातात नसल्याचं म्हणत त्यांनी हात वर केले. 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढparabhaniपरभणीPetrolपेट्रोल