शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंचे आझाद मैदानात आंदोलन सुरु, हजारो मराठा आंदोलक मुंबईत
2
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
3
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
4
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
5
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
6
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
7
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
8
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
9
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
10
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
11
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
12
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
13
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
14
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
15
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
16
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
17
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
18
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
19
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात

दसऱ्याच्या बंदोबस्ताला निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा रेल्वेखाली सापडून मृत्यू 

By राजन मगरुळकर | Updated: October 5, 2022 12:38 IST

दसऱ्याच्या दिवशीच पोलीस कुटुंबावर दुःखाचा डोंगर; परभणी रेल्वे स्थानकावर घडली दुर्घटना 

परभणी : दसऱ्याच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा चालत्या रेल्वे गाडीत चढताना तोल गेल्याने पाय घसरून रेल्वेखाली सापडल्याने मृत्यू झाला. ही घटना परभणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. या घटनेने दसऱ्याच्या दिवशी पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबासह जिल्हा पोलीस दलावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दत्ताराम श्रीराम घाग (५२, रा.पोलीस वसाहत, परभणी) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. दत्ताराम घाग हे परभणी पोलीस दलातील आरसीपी प्लाटून एकमध्ये कार्यरत होते. दसऱ्याच्या दिवशी त्यांचा मानवत येथे पोलीस बंदोबस्त लागला. या बंदोबस्ताला जाण्यासाठी पोलीस कर्मचारी दत्ताराम घाग हे बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास परभणी स्थानकावर आले. हैदराबाद येथून औरंगाबादकडे जाणारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म दोनवर उभी होती. ही रेल्वे निघताना दत्ताराम घाग हे चालत्या गाडीत चढत होते. त्यावेळी त्यांचा तोल गेला. यात ते रेल्वेखाली सापडले. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

पोलीस अधिकाऱ्यांनी केली पाहणी घटनेनंतर रेल्वे पोलीस जीआरपी आणि आरपीएफ यांनी स्थानकातील घटनास्थळी धाव घेतली तसेच पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मूम्मका सुदर्शन, सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड यांनी रेल्वे स्थानकात घटनेची पाहणी करून मयत पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. 

पोलीस कुटुंबावर शोककळाजीआरपीचे पोलीस कर्मचारी राम कातकडे, अमीनोद्दीन फारोकी, आरपीएफचे दीपक कुमार, सुरवाडे यांनी पंचनामा व पुढील प्रक्रिया केली. जीआरपीचे पोलीस कर्मचारी राम कातकडे घटनेचा तपास करीत आहेत. या प्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया जीआरपी ठाण्यात सुरु होती. दसऱ्याच्या दिवशी बंदोबस्ताला निघालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूने पोलीस कुटुंबावर तसेच जिल्हा पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

 

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिस