नुकताच या शिबिराचा समारोप झाला. समारोप कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयश्री झेंड, आयोजक डॉ. जया बंगाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. जया बंगाळे यांनी पालकांना कुटुंबातील आजी-आजोबांचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. कोरोनाच्या संकट काळात पालकांनी मुलांची कशी काळजी घ्यावी, याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
चार ते आठ वर्षे पालकांसाठी घेतलेल्या या शिबिरामध्ये ९५ बालकांनी सहभाग नोंदविला. या शिबिरात दररोज प्रार्थना, चित्रकला, सृजनात्मक कृती, सामान्यज्ञान, पाककला, विज्ञान अनुभव, शैक्षणिक मनोरंजन खेळ, नाटिका, गंमत कोडी आदी उपक्रम राबविण्यात आले. त्याचप्रमाणे पालकांसाठी देखील उपक्रम घेण्यात आले. त्यात उत्कृष्ट पालकत्व, कोरोना काळातील बालसंगोपनाचे महत्त्व, वैदिक गणितीय संकल्पना, लेखनाची पूर्व तयारी आदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रुती औंढेकर, वैशाली जोशी, मीना सालगोडे, वर्षा लोंढे आदींनी प्रयत्न केले.