शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी तालुक्यात रमाई आवास योजनेचे ८०० प्रस्ताव फेटाळले; योजना अडकली उद्दिष्टांच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 19:04 IST

लोकसंख्या व उद्दिष्टानुसार रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचे प्रस्ताव आले नसल्याने दाखल झालेले ८०० प्रस्ताव विशेष समाजकल्याण विभागाने फेटाळून लावले आहेत. तसेच गावनिहाय उद्दिष्टानुसार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पंचायत समितीला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही योजना उद्दिष्टाच्या कचाट्यात सापडल्याचे चित्र तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे.

पाथरी ( परभणी ):  लोकसंख्या व उद्दिष्टानुसार रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचे प्रस्ताव आले नसल्याने दाखल झालेले ८०० प्रस्ताव विशेष समाजकल्याण विभागाने फेटाळून लावले आहेत. तसेच गावनिहाय उद्दिष्टानुसार प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पंचायत समितीला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही योजना उद्दिष्टाच्या कचाट्यात सापडल्याचे चित्र तालुक्यामध्ये पहावयास मिळत आहे.

अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील लाभार्थ्यांना रमाई घरकूल आवास योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो. २०१७-१८ या आर्थिक वर्षामध्ये परभणी जिल्ह्यासाठी ७ हजार घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. या उद्दिष्टापैकी तालुका उद्दिष्ट विशेष समाजकल्याण विभागाने ठरवून दिले आहे. पाथरी तालुक्याला ५८२ घरकुलाचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार पंचायत समितींनी ग्रामपंचायती मार्फत प्रस्ताव मागविले होते. तालुक्यातील ८०० लाभार्थ्यांनी घरकुलासाठीचे प्रस्ताव दाखल केले होते.

या सर्व प्रस्तावांची छाननी करून सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आले. मात्र गावनिहाय, मागासवर्गीय लोकसंख्येच्या प्रमाणात प्रस्ताव आले नसल्याची बाब समाजकल्याण विभागाच्या लक्षात येताच दाखल झालेले सर्व ८०० प्रस्ताव पंचायत समितीकडे परत पाठविण्यात आले आहेत. तसेच गावनिहाय मागासवर्गीय लोकसंख्येच्या प्रमाणात प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना पंचायत समितीला दिल्या आहेत. यानुसार तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीला मागासवर्गीय लोकसंख्येच्या प्रमाणात उद्दिष्ट ठरवून दिले आहेत. त्यानुसाच रमाई आवास योजनेसाठी प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. 

प्रतीक्षा याद्याच  नसल्याने अडचणरमाई आवास घरकुल योजना आणि इंदिरा आवास योजना या दोन्ही योजनेतून मागासवर्गीयांना घरकुलाचा लाभ दिला जातो. इंदिरा आवास योजनेला प्रतीक्षा याद्या तयार होत्या. मात्र ही योजना बंद पडली. तर रमाई आवास योजनेसाठी प्रतीक्षा यादी नसल्याने प्रस्तावाबाबत अडचणी निर्माण होत आहेत.  दरम्यान, समाजकल्याण विभागाने तालुक्याला ५८२ चे उद्दिष्ट देताना ते लोकसंख्येच्या प्रमाणात गावनिहाय ठरवून दिले नव्हते. जास्तीचे प्रस्ताव आल्याने याबाबत नव्याने सूचना देऊन गावनिहाय उद्दिष्टानुसार प्रस्ताव दाखल करण्याचे सांगितल्याने ही प्रक्रिया अधिकच लांबली आहे.

७६ प्रस्ताव वरिष्ठांकडे दाखलपंचायत समिती स्तरावर गावनिहाय्य उद्दिष्टाप्रमाणे दाखल झालेले ७६ प्रस्ताव शासकीय मान्यतेसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहेत. प्रस्ताव सादर करताना नमुना नं. ८, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, जॉबकार्ड, बँक पासबूक, शपथपत्र, कच्च्या घराचे फोटो, ग्रामसभेचा ठराव आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. मात्र अनेक प्रस्तावांमध्ये या त्रुटी आढळून येत असल्याने त्रुटीतील प्रस्ताव बाद होत आहेत. तसेच इंदिरा आवास योजनेत यापूर्वी कुटुंबात लाभ घेणार्‍या लाभार्थ्यांचे प्रस्तावही अपात्र ठरले आहेत. 

पाठपुरावा सुरू आहेपं.स. स्तरावर रमाई आवास घरकूल योजनेसाठी गावनिहाय प्रस्तावाची छाननी करून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत. या प्रस्तावांना वेळेत मंजुरी मिळावी, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.-शिवकन्या राजेश ढगे, सभापती पं.स.

छाननी सुरू आहेगावनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असून दाखल प्रस्तावाची त्यानुसार छाननी सुरू आहे.-ए. एफ. शेख, सहायक गटविकास,अधिकारी