शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास विभागाकडून परभणी जिल्ह्यातील २३ रस्त्यांसाठी ७८ कोटीचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 18:48 IST

ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ग्रामविकास विभागाने परभणी जिल्ह्यातील २३ रस्त्यांसाठी ७७ कोटी ९९ लाख ५९ हजार रुपयांचा निधी  उपलब्ध करुन दिला आहे. या निधीअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात ९ तालुक्यांसह ८५० खेड्यांचा समावेश आहे. २०१७-१८ या वित्तीय वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जवळपास ७८ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

परभणी : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ग्रामविकास विभागाने परभणी जिल्ह्यातील २३ रस्त्यांसाठी ७७ कोटी ९९ लाख ५९ हजार रुपयांचा निधी  उपलब्ध करुन दिला आहे. या निधीअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे.

जिल्ह्यात ९ तालुक्यांसह ८५० खेड्यांचा समावेश आहे. परंतु, खेड्यातील रस्त्यांची पुरती वाट लागलेली आहे. ग्रामीण भागात जाण्यासाठी एकही धड रस्ता जिल्ह्यात सध्या शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. जिल्ह्यातील अर्ध्याहून अधिक रस्त्यांवर गुडघ्याइतके खड्डे पडले आहेत. अनेक वेळा खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनधारकांना अपघातांनाही सामोरे जावे लागले.  त्यामुळे ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्त करावेत, यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी प्रशासनाला निवेदने दिली, आंदोलनेही केली. परंतु, अद्यापपर्यंत रस्ता दुरुस्तीचे कामे प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आली नाहीत. त्यामुळे वाहनधारकांसह ग्रामस्थांना अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. 

लोकप्रतिनिधी व सामाजिक संघटनांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण भागातील काही रस्त्यांची कामे करण्यात यावेत, यासाठी ग्रामविकास विभागाच्या वतीने ३१ जानेवारी रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री ग्रामसडक योजना २०१७-१८ या वित्तीय वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जवळपास ७८ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच मानवत, सोनपेठ, पाथरी, परभणी, जिंतूर, सेलू, पालम, गंगाखेड आणि पूर्णा या तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची कामे होणार आहेत. त्यामुळे शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या निधीमुळे जिल्ह्यातील २३ रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. 

या रस्त्यांचा आहे समावेश 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २३ रस्त्यांच्या कामासाठी ७७ कोटी ९९ लाख ५९ हजार रुपयांच्या खर्चास ग्रामविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामध्ये परभणी तालुक्यातील टाकळी- आर्वी- कुंभारी, आनंदवाडी रस्ता, एकरुखा रस्ता, वांगी, नांदखेडा- सनपुरी- नांदापूर, झरी-मिर्झापूर तसेच मानवत तालुक्यातील सावळी- किन्होळा, वझूर बु.- वझूर खु., सोनपेठ तालुक्यातील शिर्शी -कान्हेगाव- खडका, पाथरी तालुक्यातील हादगाव- नाथ्रा रस्ता, जिंतूर तालुक्यातील जिंतूर- घेवडा- खरदरी रस्ता, खडकपाटी- राव्हा, बोरी- वाघी- जवळा, बामणी -कौठा- चौधरणी- बदनापूर, सेलू तालुक्यातील खुपसा- शिराळा, निपाणी टाकळी- करडगाव, सालेगाव रस्ता, पालम तालुक्यातील नाव्हा- नाव्हलगाव- खोरस, गंगाखेड तालुक्यातील वाघलगाव रस्ता, आबूजवाडी- लिंबेवाडी- गुंजेगाव, खादगाव- हरंगुळ, पूर्णा तालुक्यातील कावलगाव- कावलगाववाडी ते धानोरा मोत्या, आहेरवाडी रस्ता.  जिल्ह्यातील या ग्रामीण रस्त्यांचा या कामात समावेश आहे. 

१४३ कि.मी.चे होणार रस्तेमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २०१७-१८ या वित्तीय वर्षात १४३ कि.मी.रस्त्यांसाठी ७८ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे यावर्षी १४३ कि.मी.च्या रस्त्याचा कायापालट होणार आहे. तसेच या रस्त्याच्या कामांची नियमित देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ५ वर्षे राहणार आहे. त्यासाठी सुद्धा तब्बल ५ कोटी ७ लाख रुपयांच्या निधीच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षा