शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

जिंतुरातील ६० वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 12:43 IST

जिंतूर शहरातील येलदरी कॉर्नर भागातील नुरानी कॉलनी येथील ६० वर्षीय व्यक्तीवर १४ जुलैपासून उपचार सुरू होते

परभणी: जिंतूर शहरातील नुरानी कॉलनी भागातील एका ६० वर्षीय व्यक्तीचा परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असताना बुधवारी मध्यरात्री २.४० वाजेच्या सुमारास कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिंतूर शहरातील येलदरी कॉर्नर भागातील नुरानी कॉलनी येथील ६० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याने १४ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  उपचार सुरु असताना बुधवारी मध्यरात्री २.४० वाजेच्या सुमारास या व्यक्तीचा मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये जिंतूर, सेलू तालुक्यातील प्रत्येकी तिघांचा समावेश आहे.

९ जणांना कोरोनाची लागणजिल्हा प्रशासनास बुधवारी रात्री प्राप्त झालेल्या अहवालात आणखी ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये सेलू शहरातील सर्वोदय नगर येथील एक, तालुक्यातील हादगाव पावडे येथील १, पाथरी शहरातील एकता नगर भागातील ३, जिंतूर शहरातील नुरानी कॉलनी येथील १, परभणीतील दिलकश चौक, गणेशनगर येथील प्रत्येकी १ व तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३११ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील १४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १५४ जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी