शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुलांसाठी ५० खाटांचे आयसीयू उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मुलांसाठी ५० खाटांचा स्वतंत्र आयसीयू कक्ष उभारण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली असून, लवकरच ...

परभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मुलांसाठी ५० खाटांचा स्वतंत्र आयसीयू कक्ष उभारण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली असून, लवकरच हा कक्ष कार्यान्वित केला जाणार आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून, या लाटेत मुलांवर अधिक परिणाम होईल, अशी शक्यता आरोग्य तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांच बैठक पार पडली. या बैठकीत कोरोनाची तिसरी लाट आल्यानंतर काय उपाययोजना करावी लागेल, या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

या बैठकीत निश्चित झाल्याप्रमाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने मुलांसाठी ५० खाटांचा आयसीयू कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हे काम येत्या एक-दोन दिवसांत सुरू केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. तिसऱ्या लाटेमध्ये मुलांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने मोठ्या व्यक्तींची उपचार पद्धती आणि लहान मुलांच्या उपचार पद्धतीत मोठा फरक आहे. त्यामुळे लहान मुलांवर उपचार करण्यासाठी लागणार्‍या वैद्यकीय साहित्यांची खरेदी करून हे साहित्य तयार ठेवण्याचेही नियोजन यावेळी करण्यात आले. त्याचप्रमाणे येथील जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात चौथ्या मजल्यावर स्वतंत्र ४०० खाटांचे मुलांसाठीचा कक्ष सुरू करण्याचे नियोजनही प्रशासनाने केले आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असून, या काळात लागणारे मनुष्यबळ, करावयाच्या उपाययोजना या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्यासह जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञ उपस्थित होते.

आयव्ही इंजेक्शन उपलब्ध करणार

लहान मुलांना द्यावयाच्या आयव्ही स्वतंत्र पद्धतीच्या असून ऐनवेळी या आयव्हीचा तुटवडा भासू नये, या दृष्टीनेही प्रशासन तयारी करीत आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या इंजेक्शनचा साठा करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. तसेच या इंजेक्शनची मागणी वरिष्ठांकडे नोंदविण्यात येणार आहे.

औषधी साधनांसाठी नेमली समिती

कोरोना काळात मुलांना उपचारासाठी कोणती औषधी लागू शकते? त्याचप्रमाणे कोणत्या वैद्यकीय साधनांची आवश्यकता भासेल? याची एकत्रित माहिती तयार करण्याचे काम करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर मुलांसाठी लागणारी औषधी आणि इतर वैद्यकीय साधनांची मागणी वरिष्ठांकडे नोंदविण्यात येणार आहे.

अँटीबॉडीज टेस्टिंग लॅबची उभारणी

संभाव्य कोरोना लाटेत उपचारादरम्यान अँटीबॉडीज टेस्टिंग लॅबची आवश्यकता भासेल, अशी शक्यता बालरोग तज्ज्ञांनी बैठकीत वर्तवली. त्यामुळे लवकरच जिल्हा सामान्य रुग्णालयात अँटीबॉडीज टेस्टिंग लॅब उभारण्याच्या संदर्भाने उपाययोजना केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.