शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टसाठी परभणीतून ४०० वाहक- चालक मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 17:25 IST

परभणी विभागातील सातही आगारातून सरासरी २० ते २५ कर्मचाऱ्यांना मुंबईत बेस्टच्या सेवेसाठी रवाना करण्यात आले आहे.

ठळक मुद्देज्या मार्गावर कमी भारमान होते, अशा मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे.परभणी विभागात १ हजार ७६० वाहक आणि चालक आहेत.

परभणी : मुंबई येथे बेस्टच्या बस वाहतूक सेवेसाठी जिल्ह्यातील ४०० वाहक आणि चालकांना मुंबई येथे रवाना करण्यात आले असून, हे कर्मचारी पंधरा दिवस तेथे सेवा बजावणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कमी भारमान असणाऱ्या बससेवा बंद करण्यात आल्या आहेत.

मुंबई येथे लोकल बससेवा चालविणाऱ्या ‘बेस्ट’साठी महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळाने बस गाड्यांबरोबरच कर्मचारीही पुरविले आहेत. कोरोनाच्या संकट काळात मुंबईतील बससेवा सुरळीत राहावी, यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी राज्यभरातून टप्प्या-टप्प्याने कर्मचाऱ्यांना मुंबई येथे सेवेसाठी पाठविले जात आहे. कोरोनाची परिस्थिती आणि वाहक- चालकांची कमतरता लक्षात घेता, महामंडळाच्या परभणी विभागातून २०० वाहक आणि २०० चालक असे ४०० कर्मचारी २२ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे रवाना करण्यात आले असून, २३ नोव्हेंबरपासून सेवेत रुजू झाले आहेत.

परभणी विभागातील सातही आगारातून सरासरी २० ते २५ कर्मचाऱ्यांना मुंबईत बेस्टच्या सेवेसाठी रवाना करण्यात आले आहे. त्यामुळे परभणी विभागातील काही बससेवांवर परिणाम झाला आहे. परभणी विभागात २ हजार ४२७ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १ हजार ७६० वाहक आणि चालक आहेत. चारशे कर्मचारी मुंबईला रवाना केल्याने ५ टक्के बससेवा बंद कराव्या लागल्या आहेत. ज्या मार्गावर कमी भारमान होते, अशा मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. मात्र, अत्यावश्यक असलेल्या सेवांवर कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त काम करून घेऊन त्या मार्गावर बससेवा सुरू ठेवली जात असल्याने एस.टी. महामंडळातून सांगण्यात आले.

टॅग्स :state transportएसटीparabhaniपरभणी