शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
4
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
5
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
6
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
7
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
8
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
9
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
10
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
11
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
12
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
13
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
14
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
15
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
16
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
17
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
18
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

परभणी जिल्ह्यात ३८ टक्के मतदारांनी फिरवली मतदानाकडे पाठ !

By मारोती जुंबडे | Published: April 29, 2024 5:52 PM

परभणी लोकसभा मतदारसंघात २१ लाख २३ हजार ५६ एवढे मतदार असून, त्यामध्ये सर्वाधिक ११ लाख ३ हजार ८९१ पुरुष, तर १० लाख १९ हजार १३२ महिला मतदारांचा समावेश आहे.

परभणी : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदान ७५ टक्के व्हावे, असा निवडणूक आयोगाचा मानस होता. मात्र, या आयोगाच्या मानसावर मतदारांनी पाणी फिरवले असून, ८ लाख १ हजार १८८ मतदारांनी चक्क मतदानाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का का वाढत नाही. याबाबत मात्र तर्कवितर्क काढले जात आहेत. 

सहा विधानसभापैकी सर्वाधिक गंगाखेड विधानसभेत १ लाख ५१ हजार २९२ नागरिकांनी मतदान केले नसल्याचे समोर आले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ६३.१० टक्के मतदारांनी मतदान केले होते. मात्र, हे मतदान कमी झाले होते. त्यामुळे यावेळी मतदानाचा टक्का ७५ टक्के व्हावा, असा निवडणूक आयोगाचा मानस होता. त्यानुसार विविध उपक्रम हाती घेण्यात आले होते. त्याचबरोबर मतदानाच्या आदल्या दिवशी राजकीय पक्ष व नागरिकांना लोकशाहीच्या या महोत्सवात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर विविध स्पर्धाही मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने घेण्यात आल्या. मात्र, त्याचा कोणताही परिणाम जिल्हावासीयांवर झाला नसल्याचे दिसून येत आहे. 

परभणी लोकसभा मतदारसंघात २१ लाख २३ हजार ५६ एवढे मतदार असून, त्यामध्ये सर्वाधिक ११ लाख ३ हजार ८९१ पुरुष, तर १० लाख १९ हजार १३२ महिला मतदारांचा समावेश आहे. २०२४ च्या निवडणुकीत १३ लाख २१ हजार ८६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ज्याची टक्केवारी ही ६२.२६ टक्के एवढी आहे. त्यामुळे ३७.७४ टक्के नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे. यामध्ये ८ लाख १ हजार १८८ एवढ्या मतदारांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनासह राजकीय पक्षांनी केलेल्या आवाहनानंतरही मतदारांनी मतदान करण्यासाठी कानाडोळा केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे मतदानाचा टक्का दर निवडणुकीत घसरतो आहे. याबाबत मात्र प्रशासन व राजकीय पक्षांनी मंथन करणे गरजेचे आहे. अन्यथा हाच टक्का ५० टक्क्यांवर कधी येईल हे कळणारसुद्धा नाही.

टक्का घसरला; मतदान वाढले२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली असली तरीही संख्या मात्र वाढली आहे. गतवर्षी १९ लाख ८५ हजार २२८ मतदारांपैकी १२ लाख ५३ हजार ९२ जणांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी ही ६३.१० टक्के एवढी होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत १३ लाख २१ हजार ८६८ जणांनी मतदान केले. ज्याची टक्केवारी ही ६२.२६ टक्के एवढी आहे. गतवर्षीच्या तुलनेत मतदानाचा टक्का घसरला असला तरी मतदान वाढले असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

गंगाखेड विधानसभेत दीड लाख मतदारांचा कानाडोळापरभणी लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यामध्ये परभणी जिल्ह्यातील चार व जालना जिल्ह्यातील दोन मतदारसंघ आहेत. यामध्ये शुक्रवारी झालेल्या मतदानामध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक १ लाख ५१ हजार २९२ मतदारांनी मतदान करण्याकडे कानाडोळा केला आहे. त्यापाठोपाठ जिंतूर १ लाख ४० हजार १२३, परभणी १ लाख २५ हजार ३७०,पाथरी १ लाख ३५ हजार ४१२, परतूर १ लाख २५ हजार ७७०, तर घनसावंगी विधानसभा मतदारसंघात १ लाख २३ हजार २२१ मतदार केंद्रांकडेच नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :parbhani-pcपरभणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४