शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

परभणी जिल्ह्यात वर्षभरात ३७ कोटींचे वाटप : मुद्रालोन कर्ज वाटपात बँकांनी घेतला आखडता हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:24 IST

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत २०१७-१८ या वर्षात १ हजार ६४४ लाभार्थ्यांना बँकांनी ३७ कोटी ८ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे़ इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात मुद्रा लोन वाटप करताना बँकांनी आखडता हात घेतल्याचे पहावयास मिळत आहे़

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत २०१७-१८ या वर्षात १ हजार ६४४ लाभार्थ्यांना बँकांनी ३७ कोटी ८ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे़ इतर जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्यात मुद्रा लोन वाटप करताना बँकांनी आखडता हात घेतल्याचे पहावयास मिळत आहे़नवीन, होतकरू व्यावसायिक तयार होण्यासाठी केंद्रिय अर्थमंत्रालयाने ८ एप्रिल २०१५ रोजी प्रधानमंत्री मुद्रा योजना लागू केली़ नव व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच छोट्या व्यवसायाच्या विस्तारासाठी ही योजना आहे़ या योजनेत व्यवसायाच्या स्वरुपानुसार बेरोजगारांना कर्ज दिले जाते. त्यामुळे ही योजना बेरोजगारांसाठी सहाय्यभूत ठरणारी आहे़ युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगारामध्ये वाढ करणे आणि उद्योगांचा विस्तार करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे़ कर्जाच्या रकमेनुसार मुद्रा योजना ३ विभागात विभागली आहे़ या विभागांना शिशू, किशोर आणि तरुण असे नाव दिले आहे़ शिशू गटात ५० हजार रुपयापर्यंत, किशोर गटात ५० हजार ते ५ लाखांपर्यंत तर तरुण गटात ५ ते १० लाख रुपयापर्यंत कर्ज वितरित करण्यात येते़२०१७-१८ या आर्थिक वर्षांत परभणी जिल्ह्यातील बँकांनी मुद्रा योजनेंतर्गत १ हजार ६४४ लाभार्थ्यांना ३७ कोटी ८ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे़ परभणी तालुक्यात शिशू गटात ४२१ लाभार्थ्यांना १ कोटी ७ लाख, किशोर गटातील ३५४ लाभार्थ्यांना ९ कोटी २४ लाख तर तरुण गटातील १६५ लाभार्थ्यांना ८ कोटी ९७ लाख रुपयांचे वाटप झाले आहे़ गंगाखेड तालुक्यात शिशू गटात १८ लाभार्थ्यांना ७ लाख, किशोर गटातील ५२ लाभार्थ्यांना ८९ लाख तर तरुण गटातील ९ लाभार्थ्यांना ६२ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. सोनपेठ तालुक्यात शिशू गटातील ६ लाभार्थ्यांना २ लाख, किशोर गटातील ३२ लाभार्थ्यांना ६१ लाख तर तरुण गटातील ७ लाभार्थ्यांना ४ लाखांचे, पालम तालुक्यात शिशू गटातील ६ लाभार्थ्यांना २ लाख, किशोर ३३ लाभार्थ्यांना ५६ लाख तर तरुण गटात १४ लाभार्थ्यांना ७३ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे़ पूर्णा तालुक्यात शिशू गटात १७ लाभार्थ्यांना १७ लाख, किशोर गटातील ४६ लाभार्थ्यांना ७२ लाख तर तरुण गटात ९ लाभार्थ्यांना ५ लाखांचे वाटप झाले आहे़ जिंतूर तालुक्यात शिशू गटातील १३ लाभार्थ्यांना ३५ लाख, किशोर गटात ७२ लाभार्थ्यांना ३ कोटी १३ लाख तर तरुण गटातील १८ लाभार्थ्यांना ८५ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले़ सेलू तालुक्यात शिशू गटात ३६ लाभार्थ्यांना १२ लाख, किशोर गटात ९९ लाभार्थ्यांना १ कोटी ३८ लाख तर तरुण गटातील ३७ लाभार्थ्यांना १ कोटी ४५ लाखांचे वाटप करण्यात आले.पाथरी तालुक्यात शिशू गटात १० लाभार्थ्यांना ४ लाख, किशोर गटात ६८ लाभार्थ्यांना १ कोटी २९ लाख तर तरुण गटात ३२ लाभार्थ्यांना २ कोटी २३ लाख वाटप करण्यात आले आहे़ मानवत तालुक्यातील शिशू गटातील ७ लाभार्थ्यांना २५ लाख, किशोर गटात ४५ लाभार्थ्यांना ६३ लाख, तरुण गटात १८ लाभार्थ्यांना १ कोटी ३१ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे़दरम्यान, परभणी तालुका वगळता तर इतर तालुक्यांनी बोटावर मोजण्या इतक्याच लाभार्थ्यांना कर्ज वाटप केले आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील विविध बँकांनी मुद्रा योजनेत कर्ज वाटप करताना आखडता हात घेतल्याचेच स्पष्ट होत आहे.गरजू लाभार्थी योजनेपासून दूरचपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंमलात आणलेली ही योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचून बेरोजगारांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा होती़ मात्र परभणी जिल्ह्यात ही योजना अंमलात आणल्यापासून या योजनेचा बहुतांश लाभ ज्यांचे व्यवसाय आधीच सुरू आहेत, अशा नागरिकांनाच बँकांनी या योजनेतून कर्ज दिल्याचे समोर येत आहे़ त्याचबरोबर त्या त्या शाखा व्यवस्थापकांच्या ओळखीच्या, नातेवाईक व त्या बँकेच्या शाखेत ज्या व्यावसायिकांचा जास्तीत जास्त ठेवी आहेत, त्याच नागरिकांना कर्ज वाटप झाल्याचे समोर आले आहे़ गरजू लाभार्थ्यांना बँक प्रशासनाने मुद्रा योजनेचे अर्ज सुद्धा दिले नाहीत़ त्यामुळे गरजू लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत़ मुद्रा योजनेंतर्गत प्रस्ताव दाखल केलेल्या बेरोजगारांना मुद्रा योजनेचा लाभ मिळावा, यासाठी नागरिकांनी उपोषण, आंदोलन करीत निवेदने दिली आहेत़ मात्र त्यांना लाभ मिळाला नाही. त्यामुळे मुद्रा योजना खºया लाभार्थ्यांपर्यंत अजूनही पोहोचली नाही़ त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे़प्रचार, प्रसार समिती माहिती पत्रकापुरतीचप्रधानमंत्री मुद्रा योजनेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी परभणी जिल्ह्यात मुद्रा बँक योजना प्रचार, प्रसार व समन्वय जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची स्थापना केली आहे़ या समिती मार्फत जिल्ह्यातील कानाकोपºयात मुद्रा योजनेविषयी प्रचार व प्रसार करून लाभार्थ्याना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम केले जाते़ या समितीसाठी शासन दरवर्षी लाखो रुपये खर्च करते़ मात्र परभणी येथील प्रचार, प्रसार समिती केवळ माहिती पत्रक छापून मोकळी झाली आहे़ त्यामुळे या योजनेचा लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाही़ जिल्हाधिकाºयांनी लक्ष देऊन येणाºया काळात खºया लाभार्थ्यांपर्यंत मुद्रा योजना पोहचून बेरोजगारांना व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँक