शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात ३३ कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 00:21 IST

जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना रबी हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ १०़५२ टक्क्यांपर्यंतच पोहोचले आहे़ १५ डिसेंबरपर्यंत ३२ कोटी ९६ लाख १८ हजार रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित झाल्याची माहिती मिळाली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना रबी हंगामातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट केवळ १०़५२ टक्क्यांपर्यंतच पोहोचले आहे़ १५ डिसेंबरपर्यंत ३२ कोटी ९६ लाख १८ हजार रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित झाल्याची माहिती मिळाली आहे़यावर्षीच्या रबी हंगामामध्ये जिल्ह्यातील बँकांना ३१३ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपये पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने निश्चित करून दिले आहे़ परंतु, प्रत्यक्षात पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे़ जिल्हा मध्यवर्ती बँकेला ७४ कोटी ५३ लाख ८६ हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले असून, या बँकेने ३४७ शेतकºयांना १ कोटी ३८ लाख ९४ हजार रुपये (१़८६ टक्के) कर्ज वाटप केले आहे़व्यापारी बँकांना २०७ कोटी ११ लाख ३१ हजार रुपयांचे उद्दिष्ट दिले असून, या बँकांनी आतापर्यंत १२ कोटी ८९ लाख रुपये (६़२२ टक्के) कर्ज वाटप केले़ तर ग्रामीण बँकेला ३१ कोटी ८२ लाख १७ हजार रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले असून, या बँकेने १८ कोटी ६८ लाख २४ हजार रुपयांचे (५८़७१ टक्के) पीक कर्ज वितरित केले आहे़ रबी हंगामामध्ये पीक कर्ज वाटप करण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे़ विशेष म्हणजे पाथरी शहरामध्ये रबी पीक कर्जासाठी शेतकºयांना आंदोलन करावे लागले होते़ बँकांनी कर्ज वाटपाची गती वाढवावी, अशी मागणी होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज