शहरातील विकास कामांची माहिती देण्यासाठी आ.सुरेश वरपुडकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भूमिगत गटार योजनेची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, शहरातील सांडपाणी वाहून जाण्याचा प्रश्न मागील अनेक दिवसांपासूनचा कायम आहे. संपूर्ण शहरातील सांडपाणी शास्त्रीय पद्धतीने वाहून जाण्यासाठी भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ३२४ कोटी रुपये अंदाजित खर्चाचा प्रस्ताव असून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. या प्रस्तावास लवकरच मंजुरी प्राप्त होईल. शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीनुसार शहरात विकास कामे सुरू करण्यात आली आहेत. रस्ते, नाली आणि इतर विकास कामांना प्राधान्य दिले असून, या कामांना कार्यारंभ आदेशही मिळाले आहेत. त्यामुळे लवकरच कामे सुरू होतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. नोव्हेंबर अखेरपर्यंत रस्त्याची संपूर्ण कामे पूर्ण केली जाणार असल्याचेही आ.वरपूडकर यांनी सांगितले.
३२४ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST