शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत ३१ कि.मी.ची विभागीय सायकल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:30 IST

परभणी जिल्हा सायकलिंग संघटना आणि बी़ रघुनाथ महाविद्यालयाच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी परभणी येथे ३१ किमी अंतराची विभागीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी जिल्हा सायकलिंग संघटना आणि बी़ रघुनाथ महाविद्यालयाच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी परभणी येथे ३१ किमी अंतराची विभागीय सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे़या स्पर्धेच्या उद्घाटन आणि बक्षीस वितरण कार्यक्रमास खा़ बंडू जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी आ़ सुरेश देशमुख, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ़ विलास पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा क्रीडा अधिकारी कलीमोद्दीन फारुखी, प्राचार्य डॉ़ बी़ यू़ जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़ या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम बक्षीस ७ हजार रुपये, द्वितीय ५ हजार रुपये, तृतीय ३ हजार रुपये आणि चतुर्थ बक्षीस २ हजार रुपये दिले जाणार आहे़ तसेच पाच ते सातव्या क्रमांकावरील विजेत्यांना प्रत्येकी १ हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाईल़ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बाहेरगावच्या खेळाडुंची निवास व भोजन व्यवस्था संयोजन समितीने केली आहे़ २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता बी़ रघुनाथ महाविद्यालयात खेळाडुंची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे़ तेव्हा खेळाडूंनी २६ नोव्हेंबरपर्यंत रणजीत काकडे, प्रा़ डॉ़ विनोद गणाचार्य यांच्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन संयोजन समितीचे प्रमुख डॉ़ विवेक नावंदर, निलेश पटेल, प्राचार्य डॉ़ विलास सोनवणे, डॉ़ विनोद मंत्री, प्रा़ डॉ़ माधव शेजूळ, डॉ़ ज्ञानेश्वर पंडित, डॉ़ पवन चांडक, गोविंद शर्मा आदींनी केले आहे़एक दिन सायलिंग उपक्रमया स्पर्धेच्या निमित्ताने शहरातील नागरिकांना दैनंदिन सायकलिंगची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने एक दिन सायकलिंग हा उपक्रमही राबविला जाणार आहे़ या उपक्रमांतर्गत परभणी शहरात ६ किमी अंतराची सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे़ २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७़३० वाजता या उपक्रमांतर्गत बी़ रघुनाथ महाविद्यालयापासून सायकलिंगला सुरुवात केली जाणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीtourismपर्यटनcollegeमहाविद्यालय