शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात ३ तर गंगाखेडमध्ये ८ दिवसांची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 14:40 IST

१२ दिवसांमध्ये तब्बल ११५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

ठळक मुद्देकोरोना संसर्ग वाढल्याचा परिणाम

परभणी: गंगाखेड शहरात एकाच दिवशी १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी तातडीने निर्णय घेत परभणी जिल्ह्यामध्ये १२ जुलै रात्री १२ वाजेपासून ते १५ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर रुग्णसंख्या अधिक असलेल्या गंगाखेड तालुक्यात १९ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लावली आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. १२ दिवसांमध्ये तब्बल ११५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस नाजूक होत आहे. यापूर्वी १० जुलै रोजी दुपारी ३ वाजेपासून ते १२ जुलै रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू होती. ही संचारबंदी संपण्यापूर्वीच आता परभणी जिल्ह्यात तीन दिवसांची आणि गंगाखेड तालुक्यामध्ये ८ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हावासियांना आणखी तीन दिवस आणि गंगाखेडकरांना ८ दिवस लॉकडाऊन करावे लागणार आहे. या संचारबंदी काळात नेहमीप्रमाणेच सर्व शासकीय कार्यालय, त्यांची वाहने, सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, औषधी दुकाने, वैद्यकीय कर्मचारी, आपद्कालीन सेवा, अन्न वाटप करणारे वाहने, अत्यावश्यक परवाने घेतलेली व्यक्ती, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे वार्ताहर, प्रतिनिधी, वृत्तपत्र विक्रेते, पेट्रोलपंप, गॅस वितरक कर्मचाºयांना सूट राहणार आहे. दुध विक्रेत्यांना सकाळी ६ ते ९ या काळात घरोघर जावून दुध विक्री करता येईल. केवळ राष्ट्रीयकृत बँका सुरु राहतील. त्यादेखील रास्तभाव दुकानदार,पेट्रोलपंप चालक, गॅस वितरक व महावितरण कंपनीकडून येणारे चलन स्वीकारणार आहे. 

आतापर्यंतची संचारबंदी नावालाचया महिन्यात जिल्हा प्रशासनाने यापूर्वी दोन वेळा संचारबंदी लावण्याचे निर्णय घेतले आहेत. मात्र या काळातील अनुभव पाहता केवळ कागदोपत्रीच संचारबंदीचा अंमल होत असून प्रत्यक्षात बाजारपेठा बंद आणि रस्त्यावर वर्दळ सुरु अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संचारबंदी काळात नागरिकांनी स्वत:हून घराबाहेर पडू नये, असे अपेक्षित असले तरी नियम झुगारुन नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यातही मागील संचारबंदी काळात एकाही प्रशासकीय यंत्रणेने घराबाहेर पडलेल्या नागरिकाला तो घराबाहेर का आला ? खरेच त्याचे अत्यावश्यक काम आहे का? याविषयी विचारपूस केली नाही. अंमलबजावणी करणारी यंत्रणाच गायब असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे संचारबंदीचा कोणताही थाट नागरिकांना नव्हता. परिणामी संचारबंदीतही बाजारपेठ बंद असली तरी रस्त्यावर मुक्त संचार दिसून आला. त्यामुळे अशा संचारबंदीने कोरोनाचा फैलाव थांबला जाईल का? हाही प्रश्नच आहे. त्यामुळे संचारबंदी लागू करताना त्याची तेवढीच काटेकोर अंमलबजावणीही केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या