परभणी जिल्ह्यातील कोरेानाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीयरित्या घटली आहे. शुक्रवारी प्रशासनाला २ हजार ६०७ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये आरटीपीसीआरच्या २ हजार ३५९ नमुन्यांमध्ये १५० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर २४८ अँटिजन टेस्टमध्ये ४१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दिवसभरात एकूण १९१ बाधित रुग्ण आढळले आहेत तसेच शासकीय आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेणाऱ्या तिघांचा या दिवशी मृत्यू झाला. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील दोन पुरुष व खासगी दवाखान्यातील एका महिलेचा समावेश आहे तसेच आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेणाऱ्या २८० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ४९ हजार ७१४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील ४४ हजार ७७३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत १२२३ जणांचा मृत्यू झाला असून, ३ हजार ७१८ रुग्ण आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेत आहेत.
२८० कोरोनामुक्त; १९१ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST