शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत शालेय पोषण आहारचा २५७ क्विंटल तांदूळसाठा जप्त

By राजन मगरुळकर | Updated: September 20, 2022 16:08 IST

परभणीत स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई 

परभणी : गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वस्त धान्य दुकानातील तांदूळाचा साठा करून त्याची चढ्या भावाने काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या साठेबाजांवर पोलीसांच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विशेष मोहीम सुरू केली आहे. सोमवारी परभणीतील गडी मोहल्ला येथील कारवाईत पथकाने २५७ क्विंटल राशन तांदूळ जप्त केला आहे.

या प्रकरणी नानलपेठ ठाण्यात चार आरोपींवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यात दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पथक सोमवारी नानलपेठ ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना परिसरातील गडी मोहल्ला, आझाद कॉर्नर परिसरातील गोदामात स्वस्त धान्य दुकानातील राशन तांदूळाचा साठा करण्यात आल्याची माहिती पथकास मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने छापा मारला. यावेळी गोदामात ५१२ पोत्यात तांदूळ आढळून आला. पथकाने ३ लाख ८६ हजार ९२५ रूपयांचा २५७.९५ क्विंटल तांदूळ जप्त केला. याचबरोबर २९ हजार २६० रूपयांचे रिकामे पोते, पोते शिवण्यासाठीची मशीन, प्लेट काटा आदी साहित्य आणि ९४ हजार ५०० रूपयांचे शालेय पोषण आहारातील मुगदाळ व वटाणे यांचे एकूण ७० पोते असा एकूण ५ लाख १० हजार ६८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दोघांना घेतले ताब्यातया प्रकरणी चार आरोपींवर अत्यावश्यक वस्तु अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी शेख मतीन शेख रशीद, अब्दुल अजीज अब्दुल रशीद यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

यांच्या पथकाने केली कारवाईही कारवाई पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण, सुधाकर चौरे, पोलीस उपनिरीक्षक मारोती चव्हाण, साईनाथ पुयड, विलास सातपुते, रवी जाधव, दिलावर खान, मोबीन, परसोडे, खुपसे, गायकवाड, ढवळे, आव्हाड यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी