शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्याला नगरविकास विभागाकडून अडीच कोटीचा निधी; शहरी भागातील रस्त्यांचा होणार विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 17:30 IST

शहरी भागातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी नगरविकास विभागाने परभणी जिल्ह्याला अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे़ त्यात परभणी महानगरपालिकेला सर्वाधिक ७५ लाख रुपये रस्त्यांच्या विकासासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत़ 

परभणी : शहरी भागातील रस्त्यांचा विकास करण्यासाठी नगरविकास विभागाने परभणी जिल्ह्याला अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे़ त्यात परभणी महानगरपालिकेला सर्वाधिक ७५ लाख रुपये रस्त्यांच्या विकासासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत़ 

विविध विकास कामे मार्गी लागावेत, या उद्देशाने राज्याच्या नगरविकास विभागामार्फत विकास निधी दिला जातो़ रस्ते, नाल्या या बाबी शहराच्या विकासाबरोबरच सौंदर्यातही भर घालतात़ मात्र निधी नसल्याने अनेक वेळा ही कामे रखडण्याचे प्रकार यापूर्वी झाले आहेत़ ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रस्ते आणि तद्अनुषंगिक बाबींचा विकास करण्यासाठी सर्वसाधारण रस्ते अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे़ नगरपालिका, नगरपंचायती आणि महापालिकांना या निधीचे वितरण करण्यात येणार आहे़ 

नगरविकास विभागाच्या या निर्णयानुसार परभणी जिल्ह्याला २ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत़ जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग केली जाणार असून, जिल्हाधिकारी हे स्वत: नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत़ उपलब्ध झालेला निधी जिल्हाधिकार्‍यांनी त्या त्या पािलकांना वितरित करावा, ई-निविदा प्रक्रियेनंतरच प्रकल्पाच्या खर्चाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता द्यावी, सार्वजनिक मालकीच्या ठिकाणी ही कामे करावीत, या प्रकल्पांतर्गत शहराच्या विकास नियंत्रण नियमावली व विकास आराखड्याशी सुसंगत कामे आहेत का? याची खात्रीही जिल्हाधिकारी करणार आहेत़ त्याच प्रमाणे यापूर्वी या योजनेखाली मंजूर झालेल्या निधीचे उपयोगीता प्रमाणपत्र सादर केले आहे का? याची खात्री करूनच निधी वितरित करावा, असे निर्देशही या आदेशाद्वारे जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत़ 

मार्च २०१९ पर्यंत खर्च करण्याची मुभाराज्य शासनाने नागरी भागातील रस्त्यांच्या विकासासाठी दिलेले हे अनुदान एका वर्षात खर्च करण्याचे बंधन घातले आहे़ ३१ मार्च २०१९ पर्यंत या अनुदानाचा खर्च करावयाचा असून, २०१९ नंतर हे अनुदान अखर्चित राहिले तर ते तत्काळ व्याजासह शासनाच्या खात्यात जमा करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत़

९ संस्थांना मिळाला निधीपरभणी जिल्ह्यामध्ये परभणी येथे ड वर्ग महानगरपालिका असून, गंगाखेड, सेलू, जिंतूर या ब वर्गीय आणि मानवत, सोनपेठ, पूर्णा, पाथरी या क वर्गीय नगरपालिका आहेत़ तसेच पालम येथे नगरपंचायत कार्यरत आहे़ जिल्ह्यातील या ९ स्थानिक स्वराज्य संस्थांना शासनाने निधी मंजूर केला आहे़ परभणी महापालिकेला ७५ लाख रुपये, ब वर्गातील गंगाखेड, सेलू, जिंतूर या तीन नगरपालिकांना प्रत्येकी ५० लाख रुपये, क वर्गातील मानवत, सोनपेठ, पूर्णा, पाथरी या नगरपालिकांना प्रत्येकी ३५ लाख रुपये आणि पालम नगरपंचायतीला २० लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. नागरी भागातील रस्त्यांच्या कामासाठी नगरविकास विभागाने हा निधी दिला आहे़ जिल्ह्यातील सर्वच्या सर्व स्थानिक संस्थांना निधी मिळाल्याने रस्त्याची कामे मार्गी लागण्याची चिन्हे आहेत़ 

जिल्हाधिकारी यांचे राहणार नियंत्रणस्थानिक स्वराज्य संस्थांना रस्ते विकासासाठी निधी देताना त्यावर जिल्हाधिकार्‍यांचे नियंत्रण ठेवले आहे़ मंजूर झालेला निधी त्याच उद्दिष्टांसाठी खर्च होतो का? काम गुणवत्तेनुसार होते का? याची जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी करावी, असे आदेशात म्हटले आहे़