परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र वाढलेलेच आहे. रविवार व सोमवार असे दोन दिवस ४८ जणांचा मृत्यू झाला, तर मंगळवारी १८ जणांचा मृत्यू झाला. बुधवारीही २१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये आयटीआय येथील शासकीय रुग्णालयातील ८ महिला व ७ पुरुष अशा १५ जणांचा तर उर्वरित ६ जणांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ४ पुरुष व दाेन महिलांचा समावेश आहे. गुरुवारी ५१२ कोरोनाबाधितांची जिल्ह्यात नोंद झाली. तसेच ६८४ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जिल्ह्यात २७ हजार ८१० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील २१ हजार ३८८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ७१० जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत विविध आरोग्य संस्थांमध्ये ५ हजार ७१२ रुग्ण उपचार घेत आहेत.
परभणी जिल्ह्यात २१ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:18 IST