कोळवाडी येथील गोपीराज देवराव मेकेवाड यांच्या घरातील व्यक्ती १५ ऑगस्टच्या रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले होते. मध्यरात्री दीडच्या सुमारास एक व्यक्ती घरातून चोरी करून जाताना मेकेवाड यांच्या मुलीने पाहिले. यावेळी तिने आरडा ओरडा केला असता, सदरील व्यक्ती पळून गेला. यावेळी घरातील इतर मंडळी झोपेतून जागे झाले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील मनी मंगळसुत्र, सेवन पीस, गंठण आदी ५० हजारांचे सोन्याचे दागिणे गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर चोरट्यांचा शोध घेत ते गावातील गोविंद जामोदेकर यांच्या घराजवळ आले असता, त्यांच्या घरातीलही २३ हजारांचे सोन्याचे दागिणे चोरट्याने लंपास केल्याचे समजले. याबाबत १५ ऑगस्ट रोजी गोपीराज देवराव मेकेवाड यांनी पालम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
२ घरे फोडून ७३ हजारांचे दागिणे लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:23 IST