शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

१९ कोटीच्या लक्ष्मीनगर - पूर्णा रस्त्याच्या कामाची गती मंदावली; सार्वजनिक बांधकामविभागाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 12:37 IST

पूर्णा तालुक्यातील झिरोफाट्यापासून पुर्णेकडे जाणा-या रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या १०.६० किमी डांबरी रस्त्याच्या कामासाठी तब्बल १९ कोटी ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मात्र, एक वर्षानंतरही या कामाला म्हणावी तशी गती मिळली नाही.

ठळक मुद्दे औरंगाबाद येथील सा.बां. विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी १० मार्च २०१६ रोजी प्रशासकीय तर ७ सप्टेंबर २०१६ रोजी तांत्रिक मान्यता दिली़यासाठी तब्बल १९ कोटी ४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद मंजूर करण्यात आली़ आहे

परभणी : पूर्णा तालुक्यातील झिरोफाट्यापासून पुर्णेकडे जाणा-या रस्त्यावरील लक्ष्मीनगर ते पूर्णा या १०.६० किमी डांबरी रस्त्याच्या कामासाठी तब्बल १९ कोटी ४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध आहे. मात्र, एक वर्षानंतरही या कामाला म्हणावी तशी गती मिळली नाही. यासोबतच याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी साफ दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांची चांगलीच गोची होत आहे़ 

लक्ष्मीनगर ते पूर्णा या १०़६० किमी रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्याच्या कामास औरंगाबाद येथील सा.बां. विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी १० मार्च २०१६ रोजी प्रशासकीय तर ७ सप्टेंबर २०१६ रोजी तांत्रिक मान्यता दिली़ यासाठी  तब्बल १९ कोटी ४ लाख रुपयांच्या निधीची तरतूद मंजूर करण्यात आली़ या निधीतून १०.६० किमी रस्त्याच्या कामासह मार्गावर १६ नळकांडी पूल उभारायचे आहेत़ तसेच या रस्त्यावर  ३.७५ मीटर डांबरी प्रृष्टाच्या दोन्ही बाजुस स्कंदाचे अस्तित्वातील माती काम ०.४५ मीटर खोलीस खोदकाम करणे व त्यावर माती टाकून दबई करणे, डांबरी पृष्टाच्या दोन्ही बाजुस १़६५ मीटर रुंद १५ सेमी जाडीचा जीएसबीचा थर देणे व त्या बाजुस १५ सेमी जाडीस कठीण मुरमाचा थर देणे, दबई करणे आदी कामे समाविष्ट आहेत़ तसेच पूर्णा शहरातील लांबीत रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी २०० मीटर काँक्रीट नाली बांधकाम करणे आदी कामे करणे अंदाजपत्रकात समाविष्ट आहेत.

हे काम मार्च २०१८ अखेरपर्यंत पूर्ण करायचे आहे़ परंतु, सद्यस्थितीत कामाची गती अत्यंत मंदावली आहे़ या रस्ता कामावर माती मिश्रीत चुरीचा वापर केला जात असून, रस्त्याची दबईही थातूरमातूर केली जात आहे. शिवाय या रस्त्यावरील गॅस एजन्सीसमोरील रस्ता कामास अद्यापही सुरुवात झालेली नाही़ विशेष म्हणजे एका कंत्राटदाराला हे काम सुटलेले असताना या कामाचे तुकडे पाडून ते चार उप कंत्राटदारांमार्फत केले जात आहे़ 

अधिका-यांना मिळेना वेळएकीकडे तब्बल १९ कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे काम सुरू असताना दुसरीकडे या रस्ता कामाकडे पाहण्यास सा़बां़ विभागाच्या अधिका-यांना वेळ मिळेनासा झाला आहे़ १० किमीच्या कामात चार तुकडे करण्यात आले असून, या कामाचा दर्जा समाधानकारक रहावा, या अनुषंगाने अधिका-यांकडून नियमितपणे या कामाची पाहणी केली जात नसल्याच्या या भागातील ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत़ विशेष म्हणजे पंचायतराज समितीच्या दौ-यात आ़ विक्रम काळे यांनीही या कामासंदर्भात तक्रार केली होती़ परंतु, सा़बां़ विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी ती तक्रार गांभीर्याने घेतली नाही़ 

टॅग्स :parabhaniपरभणीroad safetyरस्ते सुरक्षा