शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
3
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
4
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
5
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
6
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
7
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
9
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
10
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
11
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
12
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
13
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
14
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
15
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
16
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
17
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
18
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
19
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली

१७0 गावांत टंचाईमुक्तीचे प्रयत्न

By admin | Updated: March 4, 2015 15:37 IST

शासनाच्या टंचाईमुक्त महाराष्ट्र या अभियानअंतर्गत जिल्ह्यातील १७0 गावांची निवड झाली असून, प्रशासनाच्या सर्व योजनांना एकत्रित करुन २0१९ पर्यंत ही गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.

परभणी : शासनाच्या टंचाईमुक्त महाराष्ट्र या अभियानअंतर्गत जिल्ह्यातील १७0 गावांची निवड झाली असून, प्रशासनाच्या सर्व योजनांना एकत्रित करुन २0१९ पर्यंत ही गावे टंचाईमुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. शासन आणि प्रशासनाने दाखविलेले टंचाईमुक्तीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्नांची आवश्यकता आहे.जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाला प्रारंभ झाला आहे. तलाव, सिमेंट नाला बंधार्‍यातील गाळ काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. लघू, मध्यम आणि गाव तलाव असे एकूण ६0 तलाव जिल्ह्यात असून, त्यापैकी १६ तलावांमधील ३लाख ६६ हजार ६0८ घनमीटर गाळ आतापर्यंत उपसण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ५१ सिमेंट नाला बंधार्‍यातील ५३ हजार २४0 घन मीटर गाळ काढण्यात आला. परभणी तालुक्यातील पेडगाव आणि गंगाखेड तालुक्यातील मरगळवाडी या दोन ठिकाणी मोठय़ा प्रमाणात हे काम सुरू आहे. गाळ काढण्याचे काम लोकसहभागातून करावयाचे असले तरी त्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे अडचणी सोडवून कामांना गती देण्याचे कसब जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे.

१६ तलावांचे काम सुरू- सध्या जिल्ह्यात १६ तलावांतील गाळ काढण्याचे काम लोकसहभागातून सुरू आहे. त्यात परभणी तालुक्यात पेडगाव आणि भोगाव, गंगाखेड तालुक्यात कोद्री, डोंगरगाव, मासोळी, खंडाळी, पिंपळदरी, गुंजेगाव, जिंतूर तालुक्यात येनोली, चारठाणा, वरुड, सेल तालुक्यात हादगाव, तांदुळवाडी, इटोली, बेलखेडा आणि सोनपेठ तालुक्यात वडाळी येथे हे काम सुरू आहे.अडीचशे हेक्टरचे पुनर्जीवनजलयुक्त शिवार अभियानामध्ये आतापर्यंत ५१ सिमेंट नाला बंधार्‍यातून ५३ हजार २४0 घनमीटर गाळ उपसण्यात आला आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात ४२0 टीसीएम वाढीव पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. त्यातून २५0 हेक्टर जमिनीचे पुनर्जीवन होईल, असा विश्‍वास प्रशासनाला आहे.

योजनेत अडचणी..- तलावातील गाळ उपसण्याची कामे लोकसहभागातून करावयाची आहेत. त्यासाठी शेतकर्‍यांना गाळ वाहून नेण्याचाच खर्च येऊ शकतो. परंतु गाळ उपसण्यासाठी लागणार्‍या जेसीबी मशीन व अन्य मशिनरीचा खर्च मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे काही काळापुरतीच मोफत गाळ उपसला जातो व त्यानंतर मात्र मशिनरींचा खर्च परवडत नसल्याने नाविलाजास्तव शेतकर्‍यांकडून पैसे घ्यावे लागतात. त्यामुळे शेतकर्‍यांना संपूर्णत: मोफत गाळ मिळावा यासाठी शासन व प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. अधिकारी- कर्मचार्‍यांनी या मोहिमेसाठी हातभार लावणे गरजेचे आहे.