शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

परभणीत १६ वर्षांची परंपरा : बी़ रघुनाथांच्या आठवणीत सांस्कृतिक सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:31 IST

एखाद्या साहित्यिकाच्या स्मृतीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रात अगदी मोजक्याच ठिकाणी पहावयास मिळते़ त्यापैकीच परभणी येथील ज्येष्ठ साहित्यिक बी़ रघुनाथ म्हणजेच भगवान रघुनाथ कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त चार दिवसीय सोहळा मागील १६ वर्षांपासून साजरा होतो़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : एखाद्या साहित्यिकाच्या स्मृतीनिमित्त विशेष सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रात अगदी मोजक्याच ठिकाणी पहावयास मिळते़ त्यापैकीच परभणी येथील ज्येष्ठ साहित्यिक बी़ रघुनाथ म्हणजेच भगवान रघुनाथ कुलकर्णी यांच्या स्मृतिदिनानिमित्त चार दिवसीय सोहळा मागील १६ वर्षांपासून साजरा होतो़आपल्या लेखणीतून संपूर्ण महाराष्ट्राला मराठवाड्याच्या प्रतिभेची वेगळी ओळख करून देणारा संवेदनशील कवी म्हणून बी़ रघुनाथांची ख्याती आहे़ परभणीत मागील सोळा वर्षांपासून गणेश वाचनालय व जनशक्ती वाचक चळवळीच्या वतीने चार दिवसीय महोत्सव साजरा होतो़ यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थिती लावतात़ परभणीकरांसाठी ही एक सांस्कृतिक मेजवानीच असते़ ज्येष्ठ साहित्यिकांच्या स्मृतीचे असे सोहळे साजरे होणे म्हणजे नवीन पिढीतील साहित्यिकांसाठी मार्गदर्शक वाटू ठरू शकते़ परभणी शहरातील शनिवार बाजार परिसरात गणेश वाचनालयात नुकताच बी़ रघुनाथ महोत्सव साजरा झाला़ ९ ते १२ सप्टेंबर दरम्यान झालेल्या या महोत्सवात ‘गीतगोपाळ’ हा ग.दि. माडगूळकरांच्या गीतांना सी़ रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम सादर झाला़ यात विश्वनाथ दाशरचे व संचाने गीतसंगीताचा बहारदार कार्यक्रम सादर केला़ लक्ष्मीकांत धोंड यांनी निवेदन केले़ दुसऱ्या दिवशी पक्षीतज्ज्ञ डॉ़ प्रेमेंद्र बोथरा व श्रीकृष्ण उमरीकर यांनी पक्ष्यांचे सहजीवन सचित्र समजावून सांगितले़ तिसºया दिवशी ‘फेसाटी’ या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरीवर चर्चा करण्यात आली़ लेखक नवनाथ गोरे व प्रा़ डॉ़ पी़ विठ्ठल यांनी सहभाग नोंदवला़ तर चौथ्या दिवशी चित्रपट अभिनेत्री मीना कुमारी यांच्या स्मृतींना गीत, संगीत व ओघवत्या निवेदन शैलीतून उजाळा दिला़ डॉ़ वृषाली किन्हाळकर यांनी यामध्ये आॅडीओ व व्हिडीओ फितीचा वापर सुरेख पद्धतीने केला़

टॅग्स :parabhaniपरभणीcultureसांस्कृतिकliteratureसाहित्य