परभणी जिल्ह्यात कोरेानाबाधित रुग्णांची संख्या दिवसेेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात ७३५ बाधितांची नोंद झाली. तसेच १६ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये परभणी येथील शासकीय रुग्णालयात ७ पुरुष व ५ महिला आणि खासगी रुग्णालयात २ पुरुष व दोन महिला अशा एकूण १६ जणांचा मृत्यू झाला. तसेच ५५३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत २४ हजार २३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील १८ हजार २९ रुग्णांनी कोरेानावर मात केली आहे. आतापर्यंत ६०७ जणांचा मृत्यू झाला असून, ५ हजार ६०१ रुग्ण आरोग्य संस्थांमध्ये उपचार घेत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये बहुतांश रुग्ण हे परभणी शहर व तालुक्यातील आहेत. याशिवाय पाथरी, मानवत, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा, जिंतूर, सेलू येथील रुग्ण आहेत. तसेच लातूर, नांदेड, बीड, हिंगोली, जिल्ह्यातील रुग्णांचीही परभणीत नोंद झाली आहे.