शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

पावसाळ्यात शेतकऱ्यांचे हाल होणार; पाणंद रस्ताच्या १४६२ कामांना मंजूरी, अन् सुरु केवळ ८४१

By मारोती जुंबडे | Updated: April 18, 2023 16:49 IST

ही कामे पावसाळ्याअगोदर झाली तरच शेतकऱ्यांसाठी सुलभ होणार आहे. अन्यथा खरतड रस्त्यावरूनच शेतमालाची ने-आण करावी लागणार आहे.

परभणी : शेतकऱ्यांना शेती अवजारे ने-आण करण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजना अमलात आणली. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात शासनाने १४६२ कामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये १२९७ कामांना प्रशासकीय मान्यतेसह कार्यारंभ आदेश मिळालेला आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ ८४१ कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे किमान पावसाळ्याअगोदर ही कामे पूर्ण होतील का? असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

खरीप व रब्बी हंगाम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो. या हंगामात पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक शेती अवजारांची ने-आण करावी लागते. त्याचबरोबर पीक कापणी व काढणी केल्यानंतर घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेत बांधावर जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. त्याचबरोबर रस्त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये तंटे निर्माण होत आहेत. या सर्व तंट्यांना आळा घालून शेतकऱ्यांना शेती अवजारांची ने-आण करण्यासाठी सोयीचे व्हावे, या हेतूने राज्य शासनाने मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजना अमलात आणली.

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांत १४६५ रस्त्यांना मंजुरी दिली. हे रस्ते पावसाळ्याअगोदर झाले तर शेतकऱ्यांना सोयीच्या होणार आहे; परंतु प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत १२९७ कामांनाच प्रशासनाकडून कार्यारंभ आदेश दिले आहेत. मात्र, आजपर्यंत केवळ ८४१ कामे सुरू आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यापर्यंत पूर्ण होतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. ही कामे पूर्ण झाली नाहीत तर राज्य शासनाकडून मातोश्री ग्रामसमृद्धीचे पाणंद रस्ते योजनेवर करण्यात येणारा लाखो रुपयांच्या निधीवर पाणी फेरले जाणार आहे. त्यामुळे या निधीचा योग्य विनयोग होऊन शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.

१४६५ कामांना मंजुरीमातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत जिल्ह्यात १४६२ शेत पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे पावसाळ्याअगोदर झाली तरच शेतकऱ्यांसाठी सुलभ होणार आहे. अन्यथा खरतड रस्त्यावरूनच शेतमालाची ने-आण करावी लागणार आहे.

१२९७ कामांना मान्यतामातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत ९ तालुक्यांत १४६२ कामांना मंजुरी मिळाली असली, तरी प्रशासकीय मान्यता केवळ १२९७ कामांनाच देण्यात आली आहे. त्यामुळे किमान पावसाळ्याअगोदर जिल्हा प्रशासनाने या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन ही कामे उरकून घ्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

१२९७ कामांना कार्यारंभ; सुरू केवळ ८४१ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ता योजनेअंतर्गत १४६२ रस्ता कामांना मंजुरी देण्यात आली असली, तरी आतापर्यंत प्रशासनाकडून १२९७ कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यावरूनही प्रशासनाने प्रशासकीय मान्यता मिळविलेल्या सर्वच्या सर्व १३९७ कामांना कार्यारंभ आदेश दिला असला, तरी प्रत्यक्षात मात्र ८४१ कामे सुरू आहेत. आज स्थितीत ६२१ कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे पावसाळ्याअगोदर ही कामे झाली तर शेतकऱ्यांना ते सोयीचे ठरणार आहे.

कोणत्या तालुक्यात काय स्थितीतालुका मंजुरी मान्यता कार्यारंभ सुरूगंगाखेड १७० १५५ १५५ १०५जिंतूर २४९ २३७ २३७ ९०मानवत १०७ ८१ ८१ ३८पालम १०५ ६० ६० ५३परभणी २८४ २७५ २७५ १६५पाथरी ११९ १०२ १०२ ३८पूर्णा १८४ १५९ १५९ १२४सेलू १८५ १७५ १७५ १७५सोनपेठ ६९ ५३ ५३ ५३एकूण १४६२ १२९७ १२९७ ८४१

मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजना आढावापाणंद रस्ते मंजुरी.....................१४६२प्रशासकीय मान्यता......................१२९७कार्यारंभ आदेश........................१२९७कामे सुरू ..................................८४१अद्याप सुरू न झालेली कामे.................६२१

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीparabhaniपरभणी