शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाथरीत 14 हजार लिटर दुधाचा प्रश्न ऐरणीवर; दुध संकलन केंद्रातील कुलरमध्ये झाला बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 12:52 IST

शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कुलर बंद पडल्याने आज सकाळी केंद्राने शेतकऱ्यांचे दूध संकलन करण्यास नकार दिला.

पाथरी ( परभणी ) :  येथील शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कुलर बंद पडल्याने आज सकाळी केंद्राने शेतकऱ्यांचे दूध संकलन करण्यास नकार दिला. यामुळे दुध घेऊन आलेले शेतकरी चांगलेच संतापले. केंद्र बंद झाल्याने या भागातील १४ हजार लिटर दुधाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

राज्य शासनाचे परभणी येथे दूध संकलन केंद्र आहे, या केंद्र अंतर्गत पाथरी येथे गेल्या 12 वर्षी पासून दूध संकलन केले जाते, मागील काही वर्षात शेत उत्पन्नात घट होत असल्याने या भागातील शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत. यातच गेल्या वर्षभरात दूध संकलन मोठया प्रमाणावर वाढले गेले आहे. तालुक्यात दर रोज किमान 14 हजार लिटर दुध संकलन होते. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने 14 दिवसा पासून सकाळ संध्याकाळ या दोन वेळा दूध संकलन होते. सकाळी 9 हजार लिटर तर सायंकाळी 5 हजार लिटर असे संकलन या केंद्रात होते. 

सकाळचा प्रश्न मिटलाआज सकाळी शेतकऱ्यांची दुधाने भरलेली वाहने येथील बाजार समिती च्या आवारात असलेल्या संकलन केंद्रात आली. मात्र केंद्राला कुलूप होते. यामुळे शेतकरी आक्रमक झाले व त्यांनी  रस्त्यावर दूध फेकून देण्याच्या तयारी केली. याचवेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले. यानंतर पोलीस, शेतकरी व  शासकीय अधिकारी यांची चर्चा होऊन आलेले दुध शासनाच्या वतीने परभणी येथील शासकीय दूध संकलन केंद्रात नेण्याचा निर्णय झाला. या निर्णयाने हा प्रश्न तात्पुरता मिटला गेला असला तरी सायंकाळी येथे संकलनासाठी येणाऱ्या दुधाबाबत अनिश्चितता आहे. यावेळी दूध उत्पादक संस्थेचे पपु घांडगे, विठ्ठल गिराम, अविनाश आम्ले शिवाजीराव नखाते, विजय कोल्हे, शेख खयूंम आदींची उपस्थिती होती.

कुलर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत पाथरी येथील दूध संकलन केंद्रात 3 बल्क कुलर आहेत. त्यातील एक बल्क कुलर कायमचे बंद आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन कुलरवर काम सुरू होते. मात्र, चार दिवसांपूर्वी यातील एक कुलर बंद पडले. त्यामुळे दूध संकलनाचा प्रश्न अचानक निर्माण झाला. यातच मंगळवारी दूध उत्पादक संस्थेच्या नावे जिल्हा कार्यालयाने पत्र काढून येथे दूध संकलन केले जाणार नाही. संकलित दूध संस्थांनी परभणी येथे नेऊन घालावे असे कळवले. मात्र, काही संस्थाना हे पत्र मिळाले नसल्याचे कळते.

टॅग्स :Farmerशेतकरीparabhaniपरभणी