परभणी : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत मोठी घट झाली असून, २७ मे रोजी २ हजार ७९८ अहवालांमध्ये १२२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही घटले असून, दिवसभरात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मागील तीन-चार दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाणही घटल्याने नागरिकांना अनेक महिन्यांनंतर दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी आरोग्य विभागाला २ हजार ७९८ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या २ हजार ५४० अहवालांमध्ये ८८ आणि रॅपिड टेस्टच्या २५८ अहवालांमध्ये ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्याचप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. गुरुवारी ३ रुग्णांचा मृत्यू झाला. आयटीआय हॉस्पिटलमध्ये १ आणि जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात २ रुग्ण मृत्यू पावले आहेत.
जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४९ हजार ५२० झाली असून त्यापैकी ४४ हजार ४९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २२० रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या ३ हजार ८१० रुग्ण उपचार घेत आहेत.
२५३ रुग्णांना सुटी
जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २५३ रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. त्यामुळे या रुग्णांना कोरोनामुक्त जाहीर करून रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूचा दर कमी झाला असला तरी बरे होण्याचे प्रमाण मात्र अद्यापही वाढलेली नाही.
रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण