शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
3
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
4
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
5
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
6
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
7
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
8
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
10
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
11
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
12
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
13
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
14
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
15
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
16
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
17
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
18
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध
19
Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट
20
Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

परभणी जिल्ह्यात ११६ पाणी नमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:23 IST

जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेमध्ये डिसेंबर महिन्यातील पाणी नमुने तपासण्यात आले़ यातील ११६ नमुने दूषित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जिल्हा आरोग्य प्रयोग शाळेमध्ये डिसेंबर महिन्यातील पाणी नमुने तपासण्यात आले़ यातील ११६ नमुने दूषित असल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी उपाययोजना कराव्या लागणार आहेत़आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रत्येक गावातील पिण्याच्या पाण्याची दर महिन्याला तपासणी करण्यात येते़ जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, लघु प्रयोग शाळेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत घेण्यात आलेल्या पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात येते़ परभणी तालुक्यातील दैठणा, जांब, पेडगाव, पिंगळी व झरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावामध्ये २४२ पाणी नमुने तपासण्यात आले होते़ यामध्ये दैठणा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६२ नमुन्यांपैकी १४ नमुने दुषित आढळले आहेत़ जांब अंतर्गत ५, पिंगळी ४ तर झरी केंद्रांतर्गत एका ठिकाणी दूषित पाणी नमुने आढळले आहेत़ पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २५ पाणी नमुने तपासण्यात आले होते़ यातील चार नमुने दूषित निघाले आहेत़कावलगाव केंद्रांतर्गत १ तर ताडकळस केंद्रांतर्गत ४ नमुने दूषित निघाले आहेत़ पूर्णा तालुक्यात १३३ नमुने तपासण्यात आले़ गंगाखेड तालुक्यात धारासूर केंद्रांतर्गत चार नमुने, कोद्री १, महातपुरी ९, पिंपळदरी ३ तर राणीसावरगाव केंद्रांतर्गत १२ पाणी नमुने दूषित आढळले आहेत़ तालुक्यातील ११० पाणी नमुने तपासण्यात आले होते़ यापैकी एकूण २९ नमुने दूषित निघाले़ पालम तालुक्यात ९३ नमुने तपासण्यात आले़ यापैकी चाटोरी केंद्रांतर्गत ६ तर रावराजूर केंद्रांतर्गत ५ पाणी नमुने दूषित निघाले़सेलू तालुक्यातील देऊळगाव गात केंद्रांतर्गत ६ तर वालूर केंद्रांतर्गत १४ पाणी नमुने दूषित आढळले़ एकूण ७७ नमुने तपासण्यात आले होते़ मानवत तालुक्यातील कोल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत २ तर रामपुरी केंद्रांतर्गत एका ठिकाणी पाणी नमुने दूषित आढळले़ जिंतूर तालुक्यातील आडगाव, चारठाणा केंद्रांतर्गत प्रत्येकी ५, कौसडी १, वझर ४, येलदरी ३ असे १८ नमुने दूषित आढळले़यातील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत ५६४ एकूण पाणी नमुने तपासण्यात आले़ यातील ७६ नमुने दूषित आढळले तर लघु प्रयोगशाळेत ३५८ नमुन्यांपैकी ४० पाणी नमुने दूषित निघाले आहेत़पाथरी, सोनपेठ तालुक्यात शुद्ध पाणीपाथरी तालुक्यामध्ये ५१ पाणी नमुने तपासण्यात आल़े़ यामध्ये बाभुळगाव, हादगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रत्येकी १३, पाथरगव्हाण १८ तर वाघाळा आरोग्य केंद्रांतर्गत ७ नमुने तपासण्यात आले़ एकाही आरोग्य केंद्रांतर्गत दूषित पाणी प्रयोगशाळेमध्ये आढळले नाही़ तसेच सोनपेठ तालुक्यात ५० नमुने तपासण्यात आले़ सोनपेठ आरोग्य केंद्रांतर्गत एकाही गावामध्ये दूषित पाणी आढळून आले नाही़ तसेच पूर्णा तालुक्यातील कंठेश्वर, जिंतूर तालुक्यातील आसेगाव केंद्रांतर्गतही एकही पाणी नमुना दूषित आढळला नसल्याचे या अहवालात म्हटले आहे़ब्लिचिंग पावडर वापराकडे होतेय दुर्लक्षआरोग्य विभागाच्या वतीने दूषित पाणी आढळलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला दरमहा पत्र पाठवून पाणी दूषित असल्याचे कळविले जाते़ परंतु, अनेक वेळा काही ग्रामपंचायती यावर उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत़ काही ग्रामपंचायतीकडे तर ब्लिचिंग पावडरच उपलब्ध नसल्याच्या तक्रारी येत आहेत़ याकडे ग्रामपंचायतींनी लक्ष देऊन पिण्याच्या पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडरचा वापर करून ग्रामस्थांना शुद्ध पाणी देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे़