शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

माघवारी पायी दिंडी : शिरगांवहून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायी दिंडीचे प्रस्थान, वारकऱ्यांचा मोठा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2018 15:44 IST

शिरगाव : टाळ, मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात देवगड तालुक्यातील शिरगांव वारकरी सांप्रदायाची माघवारी समता पायी दिंडीने शिरगांव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले.शिरगांव गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीच्या देवालयात प्रथम श्रीफळ ठेवून माघवारी समता पायी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शिरगांव बाजारपेठ येथील ...

शिरगाव : टाळ, मृदुंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात देवगड तालुक्यातील शिरगांव वारकरी सांप्रदायाची माघवारी समता पायी दिंडीने शिरगांव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले.शिरगांव गावचे ग्रामदैवत श्री पावणाई देवीच्या देवालयात प्रथम श्रीफळ ठेवून माघवारी समता पायी दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शिरगांव बाजारपेठ येथील श्री हनुमान मंदिर येथे शिरगांव दशक्रोशीतील वारकरी माऊली, ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र जमून हरीपाठ व आरतीचा कार्यक्रम पार पडला. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. शिरगाव येथून गेली कित्येक वर्षे वारकरी माऊली पायी दिंडीत सहभागी होत आहेत. 

यावर्षी शिरगांव गावातूनच माघवारीची समता पायी दिंडी सुरू व्हावी अशी येथील वारकरी माऊलींची इच्छा होती ती इच्छा शुक्रवार १२ जानेवारी रोजी पूर्ण झाली याचा आम्हा विठ्ठल भक्तांना अपार आनंद होत आहे. अशा प्रतिक्रिया वारीतील माऊलींनी दिल्या. ही दिंडी पुढे सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी माघवारी समता पायी दिंडीमध्ये कणकवली येथे सहभागी होणार आहे.

शिरगांव येथील दिंडीत अबाल वृद्धांसह तरूण महिला, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. शिरगांव बाजारपेठ येथे दिंडी ‘चालली चालली...चालली...पंढरपुरा, विठू तुझ्या झेंड्याचा भगवाच रंग, विठुचा गजर हरीनामाचा’ यासारखा अभंग गात विठुनामाच्या जयघोषात रिंगण केले होते. एकूणच माघवारीचा समता पायी दिंडीचा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. तर वारकरी माऊलींचा चेहºयावरील आनंद ओसंडून वाहत होता. 

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी समता, बंधुभावाची दिलेली शिकवण आजच्या पिढीकडे संक्रमित व्हावी, तरूणांनी अध्यात्माकडे वळावे, वारकरी सांप्रदायाचा वेगाने प्रसार व्हावा, सामाजिक सलोखा निर्माण होत असतानाच एकमेकांबद्दल आदरभाव निर्माण व्हावा हे या समता पायी दिंडीच्या माध्यमातून होईल याची खात्री वाटते. त्यामुळे दरवर्षी या माघवारीमध्ये समाजातील सर्वच स्तरातील लोक सामील होतात. समता आणि बंधुता निर्माण करण्यासाठी आणि संतांनी दिलेल्या वचनाप्रमाणे या वारीचे आयोजन केले जाते.- सर्वोत्तम साटम, माघवारी समता पायी दिंडी प्रमुख