शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

झुंबा

By admin | Updated: May 9, 2014 13:37 IST

नाचत नाचत व्यायाम करण्याचा एक भन्नाट प्रकार

झुंबा.
हा शब्द गेलाच असेल तुमच्या कानावरून? झुंबा ट्रेनर हे नव्यानंच उदयाला आलेलं आणि पूर्वी अस्तित्वातच नसलेलं एक करिअर.
इंटरनेट वापरताच तुम्ही, एकदा युट्यूबवर जाऊन पहाच की झुंबा करता कसं? एकदम डिस्कमध्ये गेल्यासारखं भन्नाट म्युझिक कानावर  पडेल. लोकं तुफान नाचताना दिसतील, आणि आपलाच आपल्यावर विश्‍वास बसणार नाही की हे व्यायाम करताहेत?
पण ते खरंय, झुंबा हा नृत्यप्रकार नाही तर व्यायामप्रकार आहे. कोलंबियन डान्सर आणि कोरिओग्राफर अल्बर्ट ‘बेटो’ परेझ यांनी हा प्रकार १९९0 मध्ये तयार केला. एरोबिक व्यायाम प्रकार आणि हीप हॉप, साल्सा, सांबा, मार्शल आर्ट यांची सांगड घालून झुंबा हा व्यायामप्रकार तयार झाला. व्यायाम तर होतोच पण नाचल्याचा पूर्ण आनंदही यातून मिळतो. जगभरात सध्या या झुंबाची विलक्षण क्रेझ आहे.
मी झुंबाचे क्लासेस घेते. त्याआधी सात वर्षं मी जीममध्ये ‘फिटनेस एक्सरसाइज’ करतेय. सुरुवातीला नाशकातील काही जीम्समध्ये प्रशिक्षण घेतलं. अस्थिरोग तज्ज्ञांकडेही काम केलं. नंतर डॉक्टर्स, व्यावसायिकांच्या घरी जाऊन ‘फिटनेस एक्सरसइज’वर 
प्रशिक्षण देऊ लागले. झुंबासुद्धा कॉलनी, सोसायट्यांमध्ये जाऊन शिकवला. 
अलीकडेच मी  स्वत:चं फिटनेस सेंटर सुरू केलं. फ्लोअर एक्सरसाईज अन् झुंबा हे प्रकार मी शिकवते. झुंबा करताना हजारो कॅलरीज् खर्च होतात. त्यामुळे शरीराचा समतोल राखण्यास मदत होते. आमच्याकडे ज्या महिला, मुली येतात त्यांना निव्वळ झुंबा शिकायचाय म्हणून शिकवून टाकला, असं होत नाही. आम्ही प्रत्येकीची ‘मेडिकल हिस्ट्री’ घेतो. त्यांच्या समस्यांचा अभ्यास करतो. मग त्यांना कोणत्या एक्सरसाइज कराव्या लागतील, हे ठरवतो. डान्सप्रमाणेच झुंबाविषयी अनेकांच्या मनात ‘मला जमेल की नाही?’ ही भीती असतेच; पण आम्ही त्यांना एकच सांगतो, ‘तुम्ही झुंबा एन्जॉय करा. त्यामुळे छान गप्पा होतात, शेअरिंग होतं.  ताणतणाव कमी होतात.’
   .हे ‘एवढं’ तरी हवंच.
१) सध्या अनेक डान्स क्लासेसमध्ये ‘झुंबा’ शिकवला जातो. झुंबाचा ‘नृत्य’ म्हणून ‘अपप्रचार’ झाल्याने असं होतंय. मात्र  झुंबा इन्स्ट्रक्टरचं लायसन्स असल्याशिवाय ‘झुंबा’ शिकू नये अन् शिकवूही नये. 
२) आधी आपण  झुंबा शिकावा आणि मग शिकवण्याच्या विचार करावा. झुंबा हे नवीन करिअर असलं तरी ती एक कला आहे, हे लक्षात ठेवावं.
 प्रज्ञा तोरसकर, झुंबा प्रशिक्षक