शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

...तेरी मेरी सेल्फी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:12 IST

मी असा नव्हतो, असा नाहीये, हे कुणाला सांगणार, कोण ऐकणार?

- श्रुती मधुदीपतारीख : ३० डिसेंबर २०१७.वर्ष संपत आलं की कळेनासंच होतं मला. अचानक अस्वस्थता वाढू लागते. माझ्या शरीरावरला माझा नसलेला आणि तरीही मी पांघरलेला बुरखा निसटू लागतो. मला खरंच सापडेनासच होतो मी ! मला माझीच किल्ली शोधावी लागते, ह्या इतकं दुर्दैव ते कोणतं ! नक्की का सापडत नाही मी स्वत:ला कुणास ठाऊक ! पण सतत कुणीतरी बघतंय म्हणून, कुणाला तरी आवडावं म्हणून, फेसबुकवर कुणीतरी लाइक करावं म्हणून किंवा आपल्या फोटोवरून किंवा स्टेट्सवरून कुणीतरी पटावी म्हणून, म्हणूनच मी काहीतरी बोलतो, काहीतरी वागतो. मग वर्ष संपत आलं की हुक्की आल्यासारखा किंचित व्होडका टाकून, सिगेरट पीत पीत व्याकूळ होऊन लिहीत बसतो. वर्षभरात ढुंकूनही न पाह्यलेली ही डायरी मला माझी गर्लफ्रेण्डच वाटते. पण असं डायरीला गर्लफ्रेण्ड म्हटलेलं विज्याला समजलं तर तो वेड्यातच काढेल मला. आमच्या ग्रुपमध्ये माझी चेष्टा करेल. आतून हालून जातो मी अशी माझी चेष्टा केली की नको नको होतं अगदी. पण खरं सांगतो डायरी, मी तुझ्याजवळ जितक्या मोकळेपणाने बोलू शकतो तितकं कुणाचपाशी नाही बोलता येतं, अगदी सोनालीपाशीही नाही.खरं तर सोनाली तरी कोण आहे माझी, की मी ती इतक्या जवळची असल्यासारखं बोलतोय. सतत पोरींना डेटवर बोलवणारा, फ्लर्ट करणारा, त्यावर पैसे खर्च करणारा, सिगरेट ओढणारा मी एक चॉकलेट बॉय ! सोनालीही त्या डेटवर बोलवणाºया मुलींपैकीच एक. मागच्याच आठवड्यात तिची आणि माझी भेट झाली. कॉलेजमध्ये टाइमपास करत कट्ट्यावर बसलेलो असताना विज्याने त्याच्या या सोनाली नावाच्या मैत्रिणीशी ओळख करून दिली. त्यावेळी ती काय सुंदर दिसत होती ! असं वाटलं पोरगी पाहिजे तर अशी. जिन्स, स्कीन टाइट टॉप, मोकळे सोडलेले केस, गोरी गोरीपान. एकदम चिकनी चमेली ! एक नंबर सेक्सी फिगर !मी आपला नेहमीप्रमाणे विज्याकडून तिचा नंबर मागून तिच्याशी व्हॉट्सॅपवर फ्लर्ट करू लागलो. फेसबुकवर तिचे फोटो पाहून स्वत:च्या मनाला धीर द्यायला लागलो. चार-पाच दिवस हे माझं चालू राहिलं. तीही मला हवा तसा रिस्पॉन्स देत होती. मग मी तिला मेसेज केला, will you come to have coffee with me?  त्यावर तिने मला लव्हचं चिन्ह पाठवलं आणि म्हणाली,Oh sweetheart ! Is that mean, we are going for date? lets do that baby. Will meet tomo. Cu! हा मेसेज वाचला तेव्हा माझा आनंद मोजायला ‘वाय अ‍ॅक्सिस’वर कुठलं मापच नव्हतं. म्हणजे आजपर्यंत मी अ‍ॅप्रॉच झालो होतोच पोरींना; पण पोरगी अशाप्रकारे दोन पावलं पुढे येऊन आपल्याला होकार देऊ शकते याचा काही मला अनुभव नव्हता. मी अनेक मित्रांना हा मेसेज दाखवला. एका सुंदर पोरीने आपल्याला ‘स्वीट हार्ट’ म्हटलं, स्वत:हून डेटसाठी विचारलं म्हणजे माझे बॅक राह्यलेले पेपर सुटण्यापेक्षा काहीतरी भारी होतं. मी उद्याची खूप खूप आतुरतेने वाट पाहू लागलो..पण मी खरं सांगतो डायरी, मला कुणीच समजून नाही घेऊ शकत गं. मी मला आवडलेल्या मुलीला आवडेल, असा दिसायचा, वागायचा प्रयत्न करतोय. मी विज्याला, माझ्या ग्रुपला कसा भारी वाटेन यासाठी प्रयत्न करतोय. मी गॉगल घालतोय या साºया लोकांचा ! त्यातूनच मला दिसतं हे सगळं जग ! वर्ष संपताना असं तुझ्याजवळ आलं की माझ्या डोळ्यावरला गॉगल माझ्याकडून काढला जातो. मी अगदी अगदी नग्न होतो. म्हणजे मी कुठल्याच गर्लफ्रेण्डसोबत सगळे कपडे काढूनही इतका नग्न झालो नाहीय इतका नग्न होतो ! सारं काही तुला सांगून, माझा खरा सेल्फी मला फक्त तुलाच दाखवता येतो.तर त्यादिवशी आम्ही भेटलो. खूप मजा केली. लोणावळ्याला गेलो. खाल्लं-पिलं. एका पॉइंटला इतके जवळ आलो की, आम्ही कीस केलं एकमेकांना. परताना ती माझ्या मागे बसून माझ्या पाठीला रेलून झोपी गेली न तेव्हा ती खूप सुंदर दिसत असणार, असं वाटलं मला.मला असं वाटलं, गाडी थांबवावी-उतरावं आणि तिच्या कुशीत जाऊन रडावं. तिला सांगावं की, मी वेगळा आहे कुणीतरी. मी आजपर्यंत फ्लर्ट केलंय मुलींसोबत, त्यांच्या शरीरावरून आरपार नजर फिरवली आहे, वेड्यासारखा मुलींसोबत फिरलोय, दारू प्यायलोय, सिगरेटी ओढल्यात, काय नाई केलं मी ! पण पण मला नाही आवडत गं हे सगळं. कोल्हापूरवरून मुंबईत शिकायला आलो तेव्हा इथल्या मुलांनी किती खिल्ली उडवली माझी, कसं सांगू तुला? रडू यायचं मला. कुणीच आपलं नाहीय, असं वाटायचं. एकदा माझ्या डोळ्यात पाणी पाह्यलं विज्याने आणि मुळुमुळू रडतो म्हणून टिंगल केली माझी. हळूहळू मग मीच त्यांच्या गर्दीतच सामील झालो. कट्ट्यावर बसून शिट्ट्या मारू लागलो, दारू-सिगरेट पिऊ लागलो. करणार काय होतो ! काहीच पर्याय दिसत नव्हता सोनाली. पण हा मी नाहीय, इतकंच तुला सांगायचंय. ऐकशील? समजून घेशील मला?असं वाटलं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. मागून सोनाली बराच वेळ मला हाका मारत होती. तिने रागावून मला गाडी थांबवायला सांगितली. डोळ्यातलं पाणी पाहून ती म्हणाली, ‘ओय काय झालं? आंखो मे पानी. ए प्रेमात तर नाही न पडलास माझ्या?’ मी काहीच बोललो नाही. ‘मग रडतोयस काय मुलींसारखं? चील मार. चल मार कीक.’ असं म्हणून ती मागे बसली. मी कीक मारली...

( dancershrutu@gmail.com)