शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

तुमची बाइक मान्सून रेडी आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 16:29 IST

बेदरकारपणे गाडी हाकत निघणं भरपावसात किती धोक्याचं ठरू शकतं, याची कल्पनाही न केलेली बरी...

ठळक मुद्देपावसाळ्यात आपत्ती ओढावू नये म्हणून तरी भरपावसात मोबाइलवर बोलत गाडी चालवू नका.

पाऊस आता जोरदार लागलाय. रस्त्यांना खड्डेही पडलेत. त्या खड्डय़ांनी कित्येकांचे बळी घेतले. रस्ते अपघातात बळी जाणार्‍यांची, जखमी होणार्‍यांची संख्या बरीच आहे. सरकार, व्यवस्था या सगळ्यांना दोष देता येईलही; पण त्यामुळे आपला प्रश्न सुटणार नाही. प्रश्न हाच आहे की, पावसात आपण गाडी सांभाळून चालवणार का? आपली बाईक मान्सून रेडी आहे का? म्हणजेच आपण आपल्या वाहनाची काळजी घेतोय का, त्यावर माया करतोय का? बेदरकारपणे गाडी हाकत निघणं भरपावसात किती धोक्याचं ठरू शकतं, याची कल्पनाही न केलेली बरी.त्यामुळेच ही यादी हाताशी ठेवा आणि विचारा स्वतर्‍लाच की, आपली बाइक मान्सूनसाठी सज्ज आणि सुरक्षित आहे का?

1. ब्रेक लागताहेत का?पाऊस सुरू होण्यापूर्वी आपल्या गाडीचे ब्रेक तपासून घेतलेत का? ब्रेक वायर बदलल्या आहेत का? अनेकजण तर आपल्या गाडीचा ब्रेक लागत नाही तरी आपला गाडीवर कण्ट्रोल आहे असं फुशारक्या मारत सांगतात. पण हा जिवाशी खेळ आहे. त्यामुळे तातडीनं गाडीचे ब्रेक तपासा.

2. टायर कसेत?आपल्या गाडीचे टायर पार सपाट झाले, हवा कमी असली तरी अनेकजण तशीच गाडी दामटतात. गाडीचे टायर उत्तम असणं गरजेचं आहे, त्यामुळे टायरकडे जरा लक्ष द्या.

3. हेडलाइटगाडीच्या दिव्यांचा काय विचार केलाय? ते लागतात की त्यांनी कायमचे डोळे मिटलेत? हेडलाइट लागत नसतील, इंडिकेटर बंद पडले असतील तर ते दुरुस्त करायला हवेत.

4. सव्र्हिसिंग केलं का?गाडीची खरं तर नियमित सव्र्हिसिंग करायला हवी. पण ती राहिली असेल तर निदान पावसाळ्यात तरी ती करून घ्या. गाडीला फार गृहीत धरणं बरं नाही.

5. कशी चालवताय गाडी?पावसाळ्यात मुद्दाम पाण्यातून, अतिवेगानं, झिप झ्ॉप धूम स्टाइल गाडी चालवणं जिवावर बेतू शकतं. त्यामुळे आपण कितीही स्मार्ट असलो तरी गाडी जपून चालवलेली बरी.

6.  मोबाइलवर बोलणं

पाऊस आणि गाडी चालवताना मोबाइलवर बोलणं हे किती भयानक प्रकरण होऊ शकतं, हे सगळ्यानांच कळतं. गाडी चालवताना, मान वाकडी करून, कानात इअर फोनच्या वायरी खुपसून फोनवर बोलू नये हे सगळ्यांनाच माहिती असतं. फोनवर बोलत बोलत गाडी चालवू नये, मान तिरकी करकरून बोलू नये हा तर काय कॉमन सेन्सच आहे. मुळात गाडी चालवताना फोनवर बोलावं असा काय अर्जण्ट फोन कॉल आपल्याला येत असतो? आणि एखादा फोनजर इतकाच अर्जण्ट असेल तर गाडी बाजूला घ्यावी, शांतपणे त्या फोनवर काय बोलायचं ते बोलून घ्यावं आणि मग पुन्हा गाडी चालवावी हे सांगायला कुणी तज्ज्ञ कशाला हवा? पण लोक फोनवर बोलण्यासाठी इतके आतूर असतात की, गाडी चालवताना थोडंसं दुर्लक्ष झालं तरी त्यात आपला जीव जाऊ शकतो हे त्यांच्या लक्षातही येत नाही. तरुणांना विचारा की, गाडी चालवताना फोन वापरणं कधी थांबवाल, उत्तर एकच, आमचा फोनवर बोलताना अ‍ॅक्सिडेण्ट झाला तरच !पावसाळ्यात अशी आपत्ती ओढावू नये म्हणून तरी भरपावसात मोबाइलवर बोलत गाडी चालवू नका.