शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

जगण्याचा तरुण सिनेमा

By admin | Updated: December 3, 2015 22:24 IST

इफ्फीत असे अनेक सिनेमे सादर झाले जे तरुणांनी तरी बनवले होते, नाहीतर जगण्याची तरुण तरी गोष्ट सांगत होते. इतकी तरुण की त्या गोष्टीत

 - संदीप आडनाईक, लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत

इफ्फीत असे अनेक सिनेमे 
सादर झाले जे तरुणांनी तरी बनवले होते, 
नाहीतर जगण्याची तरुण तरी गोष्ट सांगत होते.
इतकी तरुण की त्या गोष्टीत 
समकालीन वास्तव झळकत होतं. 
आजच्या जगभरातल्या तरुण जगण्याचे
सगळे बारीकसारीक कंगोरे, 
त्यातल्या खाचाखोचा, 
आणि खुपत्या जागा हे सारं पाहून अस्वस्थ व्हावं 
इतकं सारं खरं होतं !
आणि दुसरीकडे ज्या धाडसानं 
जगभरातलं तारुण्य 
आपलं जगणं मांडतंय त्याचं
विलक्षण अप्रूपही वाटतं !
 
गोव्यात इफ्फी फिल्म फेस्टिव्हलमध्ये जे तरुण सिनेमे भेटले त्याची एक झलक !
सोप्पं झालंय ना आता, शूटिंग करायचं. कॅमेरा किती हॅण्डी झालाय. मूव्ही कॅमेऱ्याची गरजच उरली नाही इतका सोपा-सुटसुटीत कॅमेऱ्याचा प्रवास सुरू आहे. डोंगर-कपारीतल्या तरुणाकडे कॅमेरा येताच तो स्टीव्हन स्पिलबर्गच्या तोऱ्यात शूटिंग करू लागलाय. त्यामुळे शहरातले हौशी सिनेमावेडेच कशाला, खेड्यातील तरुणाईही आता चित्रपट बनवू पाहत आहेत. त्याचंच एक वेगळं चित्र नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या ४६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिसून आलं.
इफ्फी म्हणतात या फेस्टिव्हलला तरुण मुलं! या महोत्सवात यंदा तरुणाई अधिक आत्मविश्वासानं वावरताना दिसली. ना भोवतालचे भान, ना दडपणाची जाणीव. थेट भिडलेले भिडूच. वाट्टेल त्या, अक्षरश: वाट्टेल त्या विषयावर चित्रपट बनवून व्यक्त होणं हे या तारुण्यानं स्वीकारल्याचं जाणवलं.
जगभरातलं तारुण्य या महोत्सवात सिनेमाच्या रूपानं भेटतं. रिल लाइफ रिअल लाइफला इथं भेटतं आणि ते फिल्मी चित्र खऱ्या दुनियेचंच चित्र मांडतं. तसाच अनुभव या फेस्टिव्हलनं दिला. याला कारण तरुण हातांनी बनवलेले काही तरुण गोष्टी सांगणारे चित्रपट. 
‘दि मॅन हू न्यू इनफिनिटी’ या ब्रिटिश चित्रपटाने महोत्सवाचा पडदा उघडला. गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन या अवघ्या ३२ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या भारतीयाची आश्चर्यचकित करणारी आत्मकथा या चित्रपटात मांडली. ती पाहताना एकेकाळच्या वेगळ्याच भारतीय तारुण्याचं दर्शन झालं. ते दर्शन एकीकडे आणि दुसरीकडे मसान हा ग्रामीण भारतातला एका तरुणीचा आणि तरुणाचा समांतर संघर्ष मांडणारा चित्रपट. भारताकडून आॅस्करसाठी नामांकन झालेला मराठी दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांचा कोर्ट हे सारं एक नवीन अनुभव देत होतं. सिनेमाची वेगळी भाषा सांगत होतं. आणि त्यात आणखी वेगळा अनुभव घेऊन आले भारतातलेच ईशान्येकडील चित्रपट. त्या चित्रपटांचा विशेष विभागच या महोत्सवात होता. मुंबईस्थित वेब डिझायनर असलेल्या ताशी या तरुणीचा क्रॉसिंग ब्रिज, एमएनएफ : द मिझो अप्राइजिंग हा अवघ्या वीस वर्षांच्या स्वातंत्र्यवीरावर आधारित मिझो भाषेतील चित्रपट, समलिंगी संबंधावरील विषय हाताळणारा नागा भाषेतील ओ माय सोउल, स्वच्छ पाण्यासाठी लढा देणाऱ्या तरुण मित्रांचा पानी हे काही प्रातिनिधिक चित्रपट असे होते की ते आपल्याच देशातल्या एका कोपऱ्यातलं एरवी न दिसणारं तरुण चित्र सांगत होते. 
नेपाळपासून इराणपर्यंत आणि अमेरिकेपासून जॉर्डनपर्यंतचे सिनेमे दुसरीकडे बदलतं जग सांगत होते. त्या बदलत्या जगात निर्माण होणारे तरुण प्रश्न आणि त्यांची फरफट मांडत होते. उदाहरणार्थ, ३000 नाईट्स नावाचा एक सिनेमा. पॅलेस्टाईनच्या एका शिक्षक तरुणीची कथा तो सांगतो. चुकीने अटक तर होतेच पण त्यापायी जवळजवळ आठ वर्षे कारागृहात काढावी लागतात. या तरुणीला कारागृहातच दिवस गेल्याचं कळतं. तेव्हा कारागृह प्रशासनाशी तिने दिलेला संघर्ष, प्रसूती, सहकारी कैद्यांचे सहकार्य याभोवती हा चित्रपट फिरतो. पॅलेस्टाईन, फ्रान्स, जॉर्डन आणि लेबनॉन या देशांची हा सिनेमा ही संयुक्त निर्मिती आहे. 
दुसरं एक उदाहरण, मस्तांग या चित्रपटाचं. तुर्कस्थानच्या दुर्गम भागात राहणाऱ्या पाच तरुण अनाथ बहिणींचा परंपरागत समाजाला सामोरं जाण्याच्या आव्हानांचे चित्रीकरण म्हणजे हा सिनेमा. सिनेमा आॅफ द वर्ल्ड या विभागात ६00 मैल्स हा मेक्सिकोचा चित्रपट दाखविण्यात आला. ग्रॅब्रियल रिस्टेन या तरुणाने या थ्रिलर माहितीपटाच्या अंगाने जाणाऱ्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
असे अनेक सिनेमे सांगता येतील, जे तरुणांनी तरी बनवले होते, नाहीतर जगण्याची तरुण गोष्ट तरी सांगत होते. इतकी तरुण की त्या गोष्टीत समकालीन वास्तव झळकत होतं. आजच्या जगभरातल्या तरुण जगण्याचे सगळे बारीकसारीक कंगोरे, त्यातल्या खाचाखोचा, आणि खुपत्या जागा हे सारं पाहून अस्वस्थ व्हावं असे क्षण आले. आणि दुसरीकडे इतक्या धाडसानं जगभरातलं तारुण्य आपलं जगणं मांडतंय याचं कौतुकही!
हे सिनेमे नाही पण या सिनेमांची काही झलक पाहायची असेल तर निदान एकदा यू ट्यूबवर त्या त्या सिनेमाचं नाव घेऊन नक्की सर्च मारा, एक वेगळा अनुभव तुमची वाट पाहत असेल!
.