शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

तरुण मुलं व्यवहारात ‘ढ’ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 17:41 IST

अमेरिकन विद्यापीठाचा अभ्यास म्हणतो, तरुण मुलांना पैशाचे व्यवहार कळत नाहीत.

ठळक मुद्देअर्थ-साक्षरता या विषयाचं महत्वाचं तरुणांनां कळत नाही.

निशांत  महाजन 

‘ढ’ आहे आजची तरुण पिढी असं कुणी म्हटलं तर आपण किती खवळून उठू? पण तसं खरंच आहे असं कुणी अभ्यासांती सिद्ध केलं तर? शिकागोतल्या लिलिओनीस विद्यापीठानं हे अभ्यासांती दाखवून दिलं आहे की, आजची तरुण पिढी विशेषतर्‍ मिलेनिअल्स हे पर्सनल फायनान्स या विषयात अगदीच ‘ढ’ आहे. त्यांच्याकडे आर्थिक साक्षरता ही गोष्ट नावालाही नाही,त्यामुळे भावी आयुष्यात पैशाबाबतची त्यांची सारीच गणितं चुकणार आहेत.वाचून जरा धक्का बसेल अशीच ही माहिती आहे आणि ती अमेरिकेतली आहे, त्यामुळे अधिक आश्चर्य वाटावं मात्र या विद्यापीठानं केलेल्या अभ्यासानुसार कॉलेजात शिकणार्‍या अनेक तरुण मुलांना साधा चेक लिहून देता येत नाही, चेक नंबर कुठं असतो तो ओळखून लिहिता येत नाहीत. बॅँकेत जाऊन चेकबूक कसं भरतात हे माहिती नाही आणि चुकून कधी ते जमाखर्चाचा हिशेबही लिहित नाहीत.ते असं का करत असतील याचं उत्तर त्यांनी शोधलं तर बहुसंख्य मुलं हे डेबीट कार्डच वापरतात, त्यामुळे त्यांना सहसा कधी बॅँकेत जावं लागलेलं नाही. ऑनलाइन ट्रान्झ्ॉक्शन करतात त्यामुळे त्यांनी कधी चेक भरले नाहीत की कधी बॅँकेतून पैसे काढले नाहीत. हा युक्तीवाद मान्य केला तरी अनेकांना हेच माहिती नाही की आपण दर महिन्याला किती पैसे खर्च करतो, किती बॅँकेतून काढतो. क्रेडीट कार्डवर काय दरानं व्याज देतो. त्यामुळे अनेकांना पैशाचं भान नाही आणि महागाईचा अंदाजही नाही.त्यातून चित्र असं दिसतं आहे की, आर्थिक साक्षरताच नाही. गुंतवणूक, बचत आणि त्याचे फायदे अनेकांच्या गावीही नाहीत. यापुढे अभ्यासक्रमातच पर्सनल फायनान्स हा विषय सुरु करायचा का याबाबत हे विद्यापीठ आता विचार करत आहेत.हे झालं अमेरिकेतील चित्र.आपल्याकडे काय परिस्थिती दिसते?* अनेक तरुण मुलांना बॅँकेत विड्रॉअल स्लिप भरता येत नाही.* चेक भरता येत नाहीत.* पोस्टाची कामं येत नाहीत की साधा अर्ज करता येत नाही.* डीडी काढता येत नाहीत.* सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिशेब लिहिता येत नाहीत.* देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करतील पण म्युच्युअल फंड, विमा यासारख्या गोष्टींची माहिती नाही.* बचत खाती काढली तर त्यात पैसे नाहीत.* क्रेडीट कार्डवर वारेमाप खर्च, मात्र त्याचं बिल भरलं जात नाही,त्यावर दंड.* एकुणच पैसे कसे वाचवायचे, कसे गुंतवायचे आणि व्यवहार कसे करायचे हेच माहिती नाही.* अशानं आपले पैसे कसे वाढतील, याचा विचारही कोणी करत नाही.* हे चित्र अत्यंत गंभीर आहे.