शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

यंदा एवढं जमेल?

By admin | Updated: December 31, 2015 20:00 IST

नवीन वर्ष कोऱ्या करकरीत डायरीसारखं, त्या कोऱ्या पानांवर काय लिहायचं, हे आपण ठरवायचं

- आॅक्सिजन टीम
 
नवीन वर्ष
कोऱ्या करकरीत डायरीसारखं,
त्या कोऱ्या पानांवर काय लिहायचं,
हे आपण ठरवायचं
आणि ते करायचंही,
तर कदाचित,
दास्तां ए जिंदगी कुछ अलग बने!
 
नवीन वर्ष आलं की आपण नेहमी संकल्प करतो.
एकदम अ‍ॅम्बिशस प्लॅनिंग करतो.
हे करू, ते करू, किती याद्या. किती धडाका.
जेमतेम १० जानेवारी उजाडत नाही तोवर आपले अनेक धडाकेबाज निर्णय फोल ठरतात. आणि काहीही न करता, पहिले पाढे पंचावन्न होतात. सगळंच प्लॅनिंग फिस्कटतं. कधी निव्वळ आपला आळस, कधी अती उत्साहानं केलेलं अवाढव्य नियोजन आणि कधी हे दोन्हीही!
त्यामुळे यंदा प्लॅनिंग न करता, काही आयडिया आपण फक्त शेअर करू...
त्यातलं सगळंच करणं आपल्याला जमेल असं नाही; पण निदान ते करण्याची एक ब्ल्यू प्रिण्ट आपल्याकडे तयार असेल. आणि त्यातली एखादी जरी गोष्ट या वर्षभरात आपल्याला जमली तरी हे वर्ष सत्कारणी लागलं असं म्हणायला हरकत नाही.
ट्राय तो कर, देखते है, कुछ नहीं तो एक्सपिरीयन्स तो मिलेगाही!
 
१) मित्रांना प्रत्यक्ष भेटा
आता यात काय नवीन, असा प्रश्न पडला असेलही. पण हल्ली आपण मित्रमैत्रिणींना फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर जास्त भेटतो, प्रत्यक्षात फार कमी. त्यामुळे यंदा ते प्रत्यक्ष भेटू. आणि भेटत राहू. भेटताना फोनवर फोटोबिटो काढून शेअरबिअर करण्यापेक्षा सरळ जेव्हा भेटू तेव्हा मनसोक्त गप्पा मारू.. इतक्या की ती भेट संपूच नये!
हे जरा जुनाट आहे, पण दोस्ती आणि दोस्त जगवण्याचा यापेक्षा भारी फॉर्म्युला नाहीये!
 
२) भटका
वाट्टेल तेवढं भटका. कॉलेजच्या काळात तर भरपूर. देशात, विदेशात नाही जाता आलं तर आपल्या आसपास भटका. लाल डब्बा सगळ्यात बेस्ट. मस्त फिरा. मिळेल ते खा, मिळेल तसं राहा. लोकांशी भरपूर बोला. त्यातून अनुभवांची जी कमाई होईल त्यासारखं शिक्षण नाही. महत्त्वाचं म्हणजे, या दिवसात वेळ असतो तो सत्कारणी लावा. नाहीतर जबाबदाऱ्या वाढल्या की हे फिरणं बंद होणार आहेच!
 
३) तब्येत
हे सगळ्यात महत्त्वाचं! दणकून खा, दणकून व्यायाम करा, सणकून काम करा. हे इतकं केलं ना तरी आपलं शारीरिक, मानसिक आरोग्य ठणठणीत राहीन. उगीच डिप्रेशनचे फुस्के झटके आपल्याला छळणार तरी नाहीत.
 
४) सिनेमे
बघून घ्या. टुकारातले टुकार सिनेमे तर बघाच; पण यूट्यूबवर उपलब्ध असणाऱ्या डॉक्युमेण्टरी, शॉर्टफिल्म, गावातल्या सिनेमंडळातले देशविदेशातले, अन्य भाषांतले सिनेमे चिक्कार फुकट बघा. सिनेमा बघणं हे दुसरं जगणं अनुभवण्यासारखंच आहे. मनसोक्त सिनेमे पाहणं म्हणजे सुख, ते वाया घालवू नकाच. 
 
५) नवीन भाषा
हे सगळ्यात महत्त्वाचं, एखादी तरी नवीन भाषा तोडकीमोडकी का होईना शिकाच. आपल्या आसपास सोय नसेल तर वाट्टेल त्या भाषेचे अ‍ॅप्स आहेत, तेही फुकट. स्वयंशिक्षण सुरू करा. नवीन भाषा शिकणं हे केवळ आनंदच देणारं नाही तर करिअरची एखादी संधी आपल्यासाठी खुली करणारं आहे. भाषा म्हणजे केवळ व्याकरण नव्हे, तर त्या भाषेत बोलणारा समाज, संस्कृती हे सारंच आपलंसं होण्याची ही एक संधी आहे.
 
६) नवीन स्किल
काहीही असू शकतं. अगदी पंक्चर काढण्यापासून ते घरच्या घरी मोबाइल रिपेअर, बागकाम, सुतारकाम, रंगकाम ते ड्रायव्हिंग ते अगदी स्वयंपाकही. कुठलंही स्किल, एकतरी यंदा शिकाच. वाटलं पाहिजे, हे मागच्या वर्षी येत नव्हतं, यंदा जमलंच!
 
७) नवे मित्र, नवीन माणसं
जुने मित्र जपायलाच हवेत, पण यंदा नवे मित्र जोडायला हवेत. दुसऱ्या जातीधर्माचे, दुसऱ्या प्रदेशातले, दुसरीच भाषा बोलणारे, वेगळ्याच पद्धतीनं जगण्याकडे बघणारे. नवीन विषय बोलणारे मित्रमैत्रिणी जोडून त्या वर्तुळातही आपला शिरकाव व्हायला पाहिजे. ते जमलं तर एक नवीन जगच तुम्हाला खुलं होऊ शकतं.
८) एक छंद
सगळ्यांनीच गाणं नी नृत्यच छंद म्हणून शिकलं पाहिजे असा काही नियम नाही. तुमच्या आवडीच्या छंदाचं काहीतरी कराच. जे आवडत असेल ते करा. पण छंद म्हणून ती गोष्ट आपल्याला आत्मविश्वासानं सांगता तर आलीच पाहिजे, त्या छंदानं आपली सारी मरगळ झटकून आपल्याला जगवलंही पाहिजे, असं काही तुमच्या आयुष्यात असेल तर वाढवा आणि नसेल तर? - शोधा.. प्लीज!!