शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

पुरुषोत्तम करतोय यार.

By admin | Updated: September 25, 2014 17:44 IST

पुण्यातील पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष, त्यानिमित्त एक खास मैफल.

हे असं ‘पुरुषोत्तम’ करत, नाटकवेडं होणं आणि जिंकण्यासाठी ‘भानावर’ राहून काम करणं असतं काय?
 
 
दिवसभर कॉलेज. मग संध्याकाळी ६ वाजता ठरलेल्या कट्टय़ावर प्रॅक्टिसला भेटायचं.
रात्रभर मग नुस्ता किचाट. तो तालमी आधीच सुरू होतो.
आधी कलाकारांच्या ऑडिशन, मग कथेचं वाचन, त्यातले बारकावे.
त्यात दहाजणांची शंभर मतं, त्यातले वाद.
असं करत करत, एकेक गोष्ट फायनल होत जाते.
आणि मग प्रत्यक्ष तालमी सुरू होतात.
‘पुरुषोत्तम करतोय यार.’
हे तीन शब्दच पुरेशी किक देतात.
आणि मग रात्रीचा शब्दश: दिवस होतो.
पहाटेपर्यंत तालीम.
मग पहाटे जाऊन काहीतरी खाऊन यायचं, टक्कं उजेडेपर्यंत तालीम सुरूच.
मग घरी सुसाट पळायचं. जाऊन थेट झोपायचंच. उठलं की कॉलेज.
नाहीतर पुन्हा बाराच्या ठोक्याला तालीम सुरू.
हे असं साधारण ‘पुरुषोत्तम’ या एका ‘करंडका’साठी आजवर  पुण्यातल्या किती कॉलेज पिढय़ांनी केलं असेल.?
पुरुषोत्तमचं यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष होतं.
म्हणजे गेली पन्नास वर्षे नाटकवेडी तरुण मुलं ‘पुरुषोत्तम करायचंच’ म्हणून पुरती भारली जातात.
आणि नाटक म्हणजे काय फक्त लेखन, दिग्दर्शन, अभिनय नव्हे.
‘पुरुषोत्तमला बॅकस्टेज करतोय’
हे अभिमानानं सांगावं इतकं पुरुषोत्तमचं ‘बॅकस्टेज’ही भरभरून देतं.
पुरुषोत्तम करंडक नावाचं एक व्यासपीठ नुस्तं नाटक शिकवत नाही, तर ‘बेस्ट’ काय असू शकतं, कस लागतो आपला म्हणजे नक्की काय होतं.
आपण जिवाच्या आंकातानं सराव करतो, काम करतो, वाट्टेल तेवढी मेहनत घेतो म्हणजे नक्की काय करतो.
आणि जिवाला जीव देणारे आणि जीव जाईपर्यंत छळणारे मित्र भेटतात म्हणजे कसे भेटतात.
हे सारं गेली अनेक वर्ष तरुण मुलांनी या पुरुषोत्तम करंडकाच्या निमित्तानं अनुभवलं.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, आज तिची ओळख चतुरस्त्र अभिनेत्री असली तरी एकेकाळी तीही याच ‘पुरुषोत्तम करंडकासाठी’ अशीच राबली होती.
आणि जिथे ‘नाटक’ केलं तिथंच ‘जड्ज’ (येस, पुरुषोत्तम करंडकासाठी मुख्य परीक्षक) म्हणून काम करण्याची संधी तिला मिळाली.
सोनाली म्हणते, ‘ यंदा काही परफॉर्मन्स तर इतके चांगले होते की, अनेकदा परीक्षक म्हणून मला माझ्या भावना कण्ट्रोल करत परीक्षकाची सभ्यता पाळावी लागली, नाहीतर अनेकदा तर असं वाटलं की स्टेजवर जाऊन या तरुण कलाकारांना गच्च मिठय़ा माराव्यात, इतकं या मुलांचं काम सुंदर होतं.’
- सोनालीनं अशी दाद द्यावी, असं नेमकं काय घडवलं या मुलांनी? पुरुषोत्तम करंडक जिंकलेल्या पहिल्या तीन एकांकिका ‘घडवणार्‍या’ तरुण लेखक -दिग्दर्शकांची या अंकात एक भेट.
आपल्याले जे करावंसं वाटतं, ते करताना नक्की काय असते त्यांची प्रोसेस? त्यासाठी नेमकं काय काय केलं त्यांनी.
याचसाठी ह्या गप्पा.
स्पर्धा विसरून ते सारे पुण्यात पर्वतीवर जमले होते, आणि मग जमली मस्त मैफल.
तीच ही मैफल आतल्या पानात.
 
परीक्षक म्हणून ‘दिसलेल्या’ तरुण लेखक-दिग्दर्शक आणि कलाकारांविषयी काय वाटतं, हे दिलखुलास सांगतेय. सोनाली कुलकर्णी आणि पुरुषोत्तम ‘जिंकलेल्या’ दोस्तांशी मस्त गप्पा