शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

मातीतली कुस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 08:46 IST

लाल मातीतल्या पहिलवानांची जिंदादिल गोष्ट शोधत तरुण मुलं आखाड्यात जातात आणि..

- प्रांतिक देशमुख

(‘मातीतली कुस्ती’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शॉर्टफिल्मचा लेखक, दिग्दर्शक आणि संकलक आहे.)

शब्दांकन- माधुरी पेठकर

यवतमाळहून पुण्याला आलो. बारावीनंतर. सिनेमाचं आकर्षण होतंच. मीडिया अ‍ॅण्ड कम्युनिकेशन स्टडीज या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला, थेट पुणे; फर्ग्युसन कॉलेज. फिल्म बनवण्याचा प्रोजेक्ट करायचा होता. आमचा दहा- बारा जणांचा क्रू, विषय शोधत होतो. त्यात चिंचेची तालीम हा आखाडा भेटला. २३६ वर्षे हा जुना आखाडा.

रिसर्चचा भाग म्हणून मी चिंचेच्या तालमीत गेलो. वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली आठ- नऊ वर्षांच्या मुलापासून कसलेले पहिलवान तालीम करत होते, मातीत रग जिरवत होते. माझ्या डोक्यात कुस्ती घोळायला लागली. वस्तादांशी, तालमीतल्या पहिलवानांशी बोलल्यानंतर खरं चित्र स्पष्ट झालं. हजारो वर्षांची परंपरा लाभलेली कुस्ती. एकेकाळी तिला राजाश्रय- लोकाश्रय होता. या काळात कुस्ती फळली, फुलली. पण आता मातीतल्या कुस्तीची जागा मॅटवरच्या कुस्तीनं घेतली. तालमीतल्या पहिलवानांना जेव्हा मॅटवरची कुस्ती खेळण्याचा आग्रह होतो तेव्हा खूप यातना होतात. माती नाही तर आपली आई हिरावली जातेय या भावनेनं कसलेल्या पहिलवांनाचा जीव व्याकूळ होतो.आखाड्याच्या चार भिंतीआड पहिलवानांच्या मनाला कुरतडणारी ही व्यथा माझ्या मनाला भिडली. ‘पहिलवानासाठी माती म्हणजे आई’ हे वाक्य माझा पिच्छा पुरवत होतं. मीही याच परंपरेत वाढलो. यवतमाळसारख्या छोट्या शहरात जन्मलो, लहानाचा मोठा झालो म्हणून कदाचित मला हा विषय जास्त भिडला. मुंबई-पुण्यात, शहरात वाढलो असतो तर कदाचित हा विषय असा भिडला नसता. गावात शेतकरी डबघाईला आलेली शेती पाहू शकत नाहीत तसाच पहिलवानही मातीतल्या कुस्तीची अवहेलना सोसू शकत नाही हे जाणवत होतं. मग मी हाच विषय फिल्मसाठी निवडला.

दोन- अडीच महिने रिसर्चसाठी गेले. आखाडा आता सवयीचा झालेला होता, पहिलवान ओळखीचे झाले, पण आमचा कॅमेरा मात्र त्यांच्या ओळखीचा नव्हता. त्याला पाहून कुस्तीतले दादा पहिलवान घाबरले. पहिलवान कॅमेऱ्यासमोर कम्फर्टेबल नाही हे पाहून आम्ही कॅमेरा बंद करून ठेवला. आठ दहा दिवस हेच. रूटीन होतं. हळहळू त्यांना आमच्या कॅमेऱ्याची भीती वाटेनाशी झाली. मग नकळत आम्ही कॅमेरा सुरू केला. शूटिंगसाठी पोझ दिलीय असा एकही क्षण न आणता पूर्ण शूटिंग अगदी नैसर्गिकपणे कॅमेराबद्ध केलं. या फिल्मचं ८० टक्के शूटिंग २० बाय १५ च्या छोट्या जागेत झालंय. ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट, मोण्टाज फिल्म हा फिल्मचा फॉर्म्युला मी ठरवला. पण ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटची कल्पना काही माझ्या क्रूला पसंत पडली नाही. पण मी ठाम होतो.

फिल्म पूर्ण झाल्यावर तिचं स्क्रीनिंग करू लागलो. पण अनेकांना ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट प्रकरण काही रुचत नव्हतं. तीन- चार महिने मी अजिबात स्क्रीनिंग केलं नाही, की कुठं कौतुकानं फिल्मही पाठवली नाही. आणि पुढे याच फिल्मला ३ मे २०१७ रोजी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. पुढे राष्ट्रीपतींच्या हस्ते बक्षीसही मिळालं.

पुरस्कार मिळाला, माझं कौतुक झालं; पण शूटिंगदरम्यान आखाड्यात जी वेदना मी अनुभवली ती मी कधीच विसरू शकणार नाही. मातीतली कुस्ती नामशेष होत चालल्याचं पहिलवानांच्या, वस्तादांच्या शब्दांतून, त्यांच्या चेहऱ्यावरच्या रेषारेषांतून जाणवतं. ती वेदना मला आजही अस्वस्थ करते.