शहरं
Join us  
Trending Stories
1
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
2
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
3
लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
4
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
5
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
6
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
7
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
8
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
9
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?
10
'कोल्हापूरकरांनो आता आपली जबाबदारी...'; मराठवाड्यातील मदतीसाठी सतेज पाटलांचे आवाहन
11
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
13
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
14
लाडकी बहीण, गॅस सबसिडी सारख्या योजनांचे पैसे अडकणार? १ ऑक्टोबरपूर्वी 'हे' काम करा पूर्ण
15
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
16
'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये समीर वानखेडेंची नक्कल; क्रांती रेडकरने Video शेअर करत दिलं सडेतोड उत्तर
17
Beed: लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण
18
Viral Video : अरे बापरे हे काय बघितलं! महिलेने कॅमेरा सुरू केला अन् पुढे जे काही घडलं... ; व्हिडीओ बघून तुम्हीही हैराण व्हाल!
19
सरकारी बँकांमध्ये वाढणार परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा! सरकार करतंय मोठी तयारी
20
२० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा...

वर्क (धिस) आउट!

By admin | Updated: November 27, 2014 21:59 IST

मग लागतो जिमचा चस्का. त्यात आता ‘व्यायामाचा हंगाम’ही सुरू झालाय. हिवाळा आला की दरवर्षी उत्साही मुला-मुलींच्या गर्दीने जिमची सेशन्स भरून वाहू लागतात.

 
- समीर मराठे
 
 
करिना कपूरच्या साईज झिरो प्रकरणापासून सुरू झालेली क्रेझ आता पन्नाशी गाठलेल्या शाहरुख खानच्या एट पॅक्सपर्यंत पोचली आहे.
यादरम्यान बॉलिवूडचे तिन्ही खान, वरुण धवन, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोन,  कॅटरीना कैफ आणि बॉलिवूडमध्ये नव्यानं आलेले अनेक हीरो-हीरोईन्स. या सार्‍यांनी आपल्याला खूपच कॉम्प्लेक्स दिला आहे आणि आपल्या बॉडीकडे जरा जास्तच निरखून पाहण्याचं वेडही लावलं आहे.
पोटाचा थोडासा घेर वाढला की आपल्याला लगेच टेन्शन येतं. कंबरेची मापं बदलली, शोधशोधून घेतलेले डिझायनर कपडे अंगावर बसायला नकार द्यायला लागले की आपल्याला ऑकवर्ड व्हायला लागतं.
- मग लागतो जिमचा चस्का. त्यात आता ‘व्यायामाचा हंगाम’ही सुरू झालाय. हिवाळा आला की दरवर्षी उत्साही मुला-मुलींच्या गर्दीने जिमची सेशन्स भरून वाहू लागतात. नंतर आटत जाते हे खरं असलं, तरी या उत्साही गर्दीला थोडे दिवस का असेना, व्यायामाचं वेड लागतंच.
 थंडी पडायला लागल्यालागल्या मन उचल खातं. मित्रमैत्रिणींना निरोप जातात, बंद पडलेला वर्कआउट सुरू होतो, ठिकठिकाणचे जॉगर्स पार्क तरुण रंगांनी रंगायला लागतात. कोणी जिम जॉईन करतं, कोणी भल्या सकाळी वॉकिंगला जायला लागतं, कोणी दोन दोन तास वर्कआउट करताना नको इतका घाम गाळायला लागतं, खाण्यापिण्यावर नियंत्रण येतं, डाएट सुरू होतं.
- शरीर आणि मनाच्याही सुदृढतेसाठी करायच्या या प्रयत्नांचा रस्ता सोपा नाही. अनेक चुकीच्या संकल्पना, शरीराला न झेपणारी साहसं करून बघण्याची क्रेझ, कष्ट टाळून सहज-सोपे शॉर्टकट घेण्याचा मोह, कुणातरी हीरो-हीरॉईनच्या अति-प्रेमात पडून त्याच्या-तिच्यासारखंच होण्याच्या वेडाने पछाडलेली धडपड असे अनेक अडथळे उभे असतात या मार्गावर.
-त्याबद्दल थोडं..
 
जिम चालू करून 
मध्येच सोडलं तर??
 
जिम सुरू करण्यापूर्वी अनेकांच्या उत्साहाचा फुगा टम्म फुगलेला असतो. पण नव्याचे नऊ दिवस सरले की जिमला दांड्या सुरू होतात आणि मग आधी उत्साहात सुरू केलेला व्यायाम कमीकमी होत थेट थांबतोच.  
- हे असं नक्की होईल, याची खात्री असलेले अनेकजण मग जिमच्या वाट्यालाच जायचं नाही असं ठरवून टाकतात.
कारण?
- जिममध्ये जाणं सोडलं, व्यायाम बंद पडला, की आपल्या शरीराची होती त्याहून वाट लागेल अशी भीती त्यांना वाटत असते. खरं तर जिमला जाणं किंवा  व्यायाम करणं एकदम बंद केल्यावर आपलं वजन वाढतं, आपण पुन्हा ‘मूळ पदावर’ येतो, याचं कारण ‘जिम’ नसून आपली ‘अँक्टिव्हिटी’ बंद पडते हेच आहे.
काही कारणाने जिमला जाणं शक्य नसेल, तर घरी नियमित व्यायाम करण्यानेही निश्‍चित फायदा होतो.
 
समजा, नुस्तं
‘मॉर्निंग वॉक’ला गेलं तर?
 
चालणं हा निश्‍चितच चांगला व्यायामप्रकार आहे. व्यायामाची सुरुवात म्हणून तर चालणं खूपच उपयुक्त आहे, पण म्हणून ‘सकाळी उठलं की सुटा चालत’ असं करून कसं चालेल? तुम्ही कुठे चालता, कसं चालता, किती वेळ चालता, या सार्‍याच गोष्टींना खूप महत्त्व आहे. डांबरी रस्त्यावर चालण्यापेक्षा (मातीच्या) जॉगिंग ट्रॅकवर चालणं केव्हाही उत्तम. पायात व्यायामाचे शूजही असले पाहिजेत. नाहीतर तुमच्या पायांना दुखापत होऊ शकते.
-चालायला जाणं हा व्यायामाचा एक महत्त्वाचा भाग आणि प्रकार आहे. पण म्हणून तरुण वयात ‘पुरेसा’ आहे, असं म्हणता येणार नाही.
 
सक्काळी उठून आणि
उपाशीपोटी..??
 
अनेकांची समजूत असते, की व्यायाम करताना पोट रिकामं असलं पाहिजे, नाहीतर त्रास होतो. खरंतर ‘उपाशीपोटी नको आणि भरल्यापोटीही नको’ हेच व्यायामाचं मुख्य सूत्र आहे. व्यायाम सुरू करण्याच्या काही काळ आधी पोटात काहीतरी गेलेलं असलंच पाहिजे. रात्रीचे किमान आठ-दहा तास आपल्या पोटात काहीही नसतं. भल्या सकाळी उठून उपाशीपोटी केलेल्या व्यायामाने थकवाही लवकर आणि जास्त येतो. त्यामुळे व्यायामाच्यावेळी पोट अगदीच रिकामं नको. हलकं काहीतरी पोटात गेलेलं असलं पाहिजे.  व्यायामानंतरही पोट अगदीच रिकामं नको. व्यायामामुळे स्नायूंची झीज झालेली असते, ती भरून काढण्यासाठी काही वेळानंतर योग्य प्रमाणात घेतलेला योग्य आहार महत्वाचा आहे. 
 
 
 
व्यायाम करून कुणाला ‘बॉडीबिल्डर’ व्हायचंय?
 
जिममध्ये जाऊन घाम गाळल्यामुळे, वेट ट्रेनिंग केल्यामुळे आपले मसल्स लगेच फुगतील आणि आपण ‘बॉडीबिल्डर’ दिसायला लागू अशी भीती अनेकांना असते.  आपण वजन उचलायला लागलो, वेट ट्रेनिंग घेतलं की शरीराचा नाजूक डौल जाऊन नको असलेला पिळदारपणा वाट्याला येईल याची धास्ती मुलींना तर फारच असते.
- ही समजूत चुकीची आहे.
आपल्याला झेपेल इतपत वजन उचलणं, वेट ट्रेनिंग घेणं स्नायूंच्या लवचिकतेसाठी आवश्यकच असतं. पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे त्यांचं शरीर लवकर पिळदार दिसू शकतं. इस्ट्रोजेन या हार्मोन्समुळे स्त्रियांचं शरीर मुळातच पुरुषांसारखं पिळदार होऊ शकत नाही.
 
हृतिकचे सिक्स पॅक्स
आणि दीपिकाची फिगर
 
आपल्या डोळ्यासमोर असलेल्या कुणा एका फिटनेस आयकॉनसारखंच आपणही असावं / दिसावं असं वेड घेऊन व्यायामाची सुरुवात करणारे उत्साही कॉपीकैट अखेरीस निराश होतानाच दिसतील.
कोणत्याही गोष्टीला रिस्पॉण्ड करण्याची प्रत्येकाच्या शरीराची प्रक्रिया भिन्न असते, प्रत्येकाचा स्टॅमिना वेगळा असतो स्पीड वेगळा, स्ट्रेंग्थ वेगळी आणि एन्ड्युरन्स लेव्हलही वेगळी असते. त्यामुळे ‘त्याच्यासारखं’ किंवा ‘तिच्यासारखं’ दिसण्याचा वेडगळ अट्टहास आपण सोडायला हवा. आपण आपल्यासारखंच असायला हवं.
 
वेट्लॉस होतच नाहीये,
काय उपयोग व्यायामाचा? 
 
आपण बर्‍याचदा आरंभशूर असतो. भल्या पहाटे उठतो, व्यायामाला सुरुवात करतो, जिमला जातो, रनिंग करतो, खाण्यापिण्यावर नियंत्रण आणतो. काही दिवस सारं काही उत्साहात आणि हौशीनं चालतं, पण लवकरच या उत्साहाला ओहोटी लागते.  
-वजनाचा काटा हलत नाही. स्टैमिना वाढत नाही.
मग वाटायला लागतं, इतकं करून काय फायदा?  व्यायाम ही फक्त थंडीच्या दिवसापुरती करण्यासाठीची गोष्ट नाही. तो कायमस्वरूपी असला पाहिजे. थोडा का होईना, आपल्याला झेपेल इतका (योग्य) व्यायाम रोज केला तरच त्याचे फायदे वाट्याला येतील.
 
‘सप्लिमेण्ट्स’चे डबे
आणि प्रोटीनची पावडर
 
आजकाल कुठल्याही जिममध्ये जा, सप्लिेमेण्ट्सच्या वेडाने पछाडलेले कितीतरी जण बाजारातून आणलेले डबेच्या डबे फस्त करताना दिसतात. बर्‍याचदा जिम ट्रेनरही तिथे येणार्‍या तरुणांना ही सप्लिमेण्ट्स सजेस्ट करतात.  खरं म्हणजे याबाबत योग्य ते तारतम्य असलं पाहिजे. तुम्ही किती व्यायाम करता, कसा करता, तुमच्या शरीराला तुमच्या आहारातून अत्यावश्यक घटक मिळतात की नाही, यावर सप्लिमेण्ट्स घ्यावीत की नाहीत, हे अवलंबून असतं.  बंद डब्यातली  प्रोटिन पावडर  इर्मजन्सीसाठी असते हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण ते ‘लोएस्ट कॉलिटी फूड’ आहे असं तज्ञांचं म्हणणं आहे. त्यावर प्रोसेसिंगही मोठय़ा प्रमाणावर केलेलं असतं. आपल्या शरीराला आवश्यक असलेले 
घटक आपल्या नेहमीच्या अन्नातूनच मिळाले तर केव्हाही उत्तम, पण त्याची कमतरता असेल आणि इर्मजन्सीसाठी सप्लिमेण्ट्स घेता येऊ शकतात.
 
स्ट्रेचिंग इज मस्ट,
योगा इज सेफ..??
 
‘व्यायामाच्या आधी आणि नंतरही स्ट्रेचिंग केलं पाहिजे, तर इंज्युरीज होणार नाहीत’. जवळजवळ प्रत्येक जण हे सांगत असतो. पण आधुनिक संशोधनानं या समजाला चॅलेंज केलं आहे. अलीकडच्या काळात तर यासंबंधी बरंच संशोधन झालं आहे आणि त्याचा सारांश असा, की या स्ट्रेचिंगचा फारसा फायदा होत नाही. सौम्य प्रमाणात स्ट्रेचिंग ठीक, पण त्याचा अतिरेक केला तर वेगळीच दुखणी पाठीशी लागू शकतात. जिम्नॅस्टिक, फिगर स्केटिंगसारख्या क्रीडाप्रकारांसाठी एक्स्ट्रा फ्लेक्जिबिलिटी आवश्यक, पण रोजच्या व्यायामासाठी शरीराचं पार रबर करण्याची गरज नसते.
 ‘योगासनं’ हा कोणत्याही वयोगटातल्या स्त्री-पुरुषांसाठी सौम्य आणि अतिशय सुरक्षित व्यायामप्रकार आहे असाही एक समज रूढ आहे. योगासनं करणं चांगलंच, पण काही आसनं खरोखरच अत्यंत कठीणअसतात. त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या निरिक्षणाखाली योग्य प्रशिक्षण आवश्यक असतं.
 
जिंदगी के लिए सांस और एक्सरसाईस !
 
तुमचं वय काय, तुम्ही काय करता, स्त्री आहात की पुरूष, याचा आणि व्यायामाचा काहीच संबंध नाही. प्रत्येकानं व्यायाम करायलाच हवा. ध्यान में रखो, हर इन्सान अलग है.  
‘कोण कसा दिसतो, त्याची फिगर कशी आहे’ यापेक्षा ‘मी’ कसा आहे आणि मी काय केलं पाहिजे, काय नाही याचा विचार आपण आधी करायला हवा. ‘दुसर्‍यासारखं आपल्याला कधीच होता येणार नाही’ हे आधी लक्षात ठेवा. दुसर्‍याचं सेम टू सेम अनुकरणही करू नका. ‘कोई बंदा पचास किलो वेट उठा रहा है, तो जरुरी नहीं, आप भी उतनाही वेट उठाओ.’ 
तुमचा स्टॅमिना किती आहे, तुमचं वय काय, तुमची गरज काय, तुमची मेडिकल हिस्ट्री काय, तुम्ही सकाळी व्यायाम करताहात, दुपारी की संध्याकाळी? तुमच्या पोटात काही आहे की नाही?. या सार्‍या गोष्टी विचारात घेऊनच व्यायाम करायला हवा. 
और एक.  जिंदगी के लिए सांस जैसे जरुरी है, 
वैसेही एक्सरसाईस.
हरदम चलती रहना चाहिए.
 
- प्रेमचंद डेग्रा
(माजी विश्‍वश्री)