शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

थंडीतला थकवा पळवायचाय, हे करुन पहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 13:45 IST

अनेकजण थंडीत तब्येत कमावतात. पण आपल्याला थकवा येतो, झोपावंसं वाटतं. फटीग येतो, काहीच सुचत नाही, असं का होतं?

ठळक मुद्देफक्त हिवाळ्यातच नाही तर वर्षभर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर याबाबत योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सारीका पूरकर- गुजराथी

हिवाळा. सगळ्यांचाच आवडता ऋतू. बाजारात मस्त गाजर-मटारचे ढीग लागलेले असतात. भाज्यांची रेलचेल असते. आरोग्यासाठीही हिवाळा पोषक मानला जात असल्यामुळे घरोघरी मेथी-डिंकाच्या लाडवांचा खुराक सुरू होतो. शरीरसौष्ठव कमवायचं म्हणूनही अनेकांची लगबग सुरू होते. भल्या सकाळी जॉगिंग ट्रॅक्स, जिम गर्दीने फुलून जातात. सध्या चांगली थंडी पडू लागली आहे. अनेकजण एकदम फिटनेस फ्रिक होतात. त्यातलं पिअर प्रेशर वाढलं. मग आपल्यालाही वाटतं  स्वतर्‍ला फिट, फ्रेश आणि फाईनशाईन बनवून टाकावं.पण पहिली अडचण म्हणजे थंडीत छान उबदार सकाळी पांघरूणातून डोकंही बाहेर काढावंसं वाटत नाही. उठावंसंच वाटत नाही. रोज वाटतं, आज नक्की उठू लवकर, फिरायला जायला सुरुवात तरी करू; पण होत नाही.घाबरू नका, तुम्ही एकटे नाहीत असं वाटणारे किंवा करणारे. अनेकजणांना असंच वाटतं, काहीजण मनाचे पक्के म्हणून आपल्या वाटण्यावर मात करतात इतकंच. हिवाळा म्हटलं की दिवस छोटे, रात्न मोठी म्हणून भरपूर झोपायला मिळणार म्हणून खुश होणार्‍यांपैकी तुम्ही असाल तर मग तुमच्या अंगात हिवाळ्यातला आळस संचारला आहे बरं का ! हिवाळ्यात आळस वेगळा असतो का? असा प्रश्न पडणं साहजिकच आहे; पण असतो हा हिवाळी आळस, थकवा. आठ-आठ वाजेर्पयत ब्लँकेटमध्ये शरीराचं मुटकुळं करून पडून राहिलं तरी तो थकवा जात नाही. उलट जास्तच वेढतो. फटीग येतो, त्यावर उपाय काय?

1) सूर्यप्रकाश ! उन्हात बसा !हिवाळ्यात रात्न मोठी असते, त्यामुळे सकाळी, पहाटे अंधारच असतो. लवकर उजाडत नाही. यामुळे सूर्यप्रकाशही लवकर तुमच्यार्पयत पोहचत नाही. या वातावरणात तुमच्या शरीरात मेलाटेनिन हा हार्मोन मोठय़ा प्रमाणात विकसित होतो, ज्यामुळे तुम्हाला जास्त झोप येते. म्हणूनच सकाळी उठल्या-उठल्या तुमच्या दारा-खिडक्यांचे पडदे आधी बाजूला सारून सूर्यप्रकाशाला घरात येऊ द्या. घराच्या गॅलरीत, टेरेसमध्ये, असल्यास लॉनवर सूर्यप्रकाशात वावर वाढवा. तसेच ऑफिसमध्ये असतानाही लंच ब्रेकमध्ये शक्य झाल्यास उन्हात थोडावेळ तरी थांबा. स्वच्छ हवा, सूर्यप्रकाश यामुळे आपोआपच फ्रेशनेस येईल.2) वेळेवर झोपारात्नीची झोप शांत व पुरेशी झाली नाही तरी थकवा येतो. अनइझी वाटतं. पण, थंडी म्हटलं की झोप लागणारच असं म्हणून 8-10 तास झोपेच्या सवयीला पाठीशी घालू नका. उलट तुम्ही जेवढे जास्त तास झोप घ्याल, तेवढा आळस वाढत  जातो. हिवाळा आहे म्हणून झोपेची गरज जास्त असते, असं काहीही नसतं. तुम्ही दररोज जेवढी झोप घेता, तेवढीच घ्या (सहा ते आठ तास पुरेशी समजली जाते). रात्नीची झोप शांत लागावी यासाठी बेडरूम स्वच्छ ठेवा, योग्य बिछाना वापरा. पांघरूणही ऊबदार, कम्फर्टेबल घ्या. टीव्ही-मोबाइलला लांब ठेवा.3)नियमित व्यायाम कराहिवाळ्यात संध्याकाळ चटकन होते, अंधारही लवकर पडतो. थंडीही जोर धरू लागते. मग पुन्हा स्वेटर-टोपी-ग्लोव्हज घालून घरात अथवा शेकोटीभोवती बसून राहावंसं वाटतं. काही करूच नाही असं वाटतं. हा आळस झटकायचा असेल तर व्यायामाची सवय लावून घ्या. व्यायामामुळे आळस दूर होऊन एनर्जी लेव्हल वाढते, शिवाय आरोग्याचे इतरही फायदे आहेतच की ! काय करणार मग व्यायाम? तर बॅडमिंटन हे त्याचं सोपं उत्तर आहे. भरपूर बॅडमिंटन खेळा, टेनिसही खेळा. फूटबॉल आवडत असेल तर तेही ट्राय करा; पण व्यायाम करा. योगा, रॉक क्लायम्बिंग करा, तुम्ही जे एन्जॉय करता, ते करा. फिटनेस क्लास जॉइन करा.4) रिलॅक्स राहा दिवस छोटा असल्यामुळे कामं उरकतील का? (घरचे किंवा ऑफिसचे) ही चिंता तुम्हाला सतावत  असेल,  तुम्ही तणावात राहत असाल तर तसं करू नका. कारण सर्वात जास्त थकवा हा तणावामुळे येत असतो. त्यामुळे मग झोपेवर परिणाम होतो. स्वतर्‍ला टेन्शन फ्री ठेवण्यासाठी मेडिटेशन, योगा, श्वासाचे व्यायाम करा. तणावावर मात करणं सोपं नसतं. झटपट तर ते होतच नाही; पण तरीही सकारात्मक विचार करणं, स्वतर्‍च्या छंदांना-माणसांना वेळ देणं, ज्या गोष्टी बदलता येऊ शकत नाहीत, ते वास्तव स्वीकारणं, हार्डवर्कपेक्षा स्मार्ट वर्क करणं या सोप्या गोष्टींना फॉलो केलं तर ताण-तणाव दूर राहतात.5) योग्य आहार घ्या तुम्ही अंडरवेट किंवा ओव्हरवेट असला, तरी एनर्जी लेव्हल बिघडते. म्हणून तुम्हाला सतत झोप हवीहवीशी वाटते. आळस वाढत जातो. हिवाळा हा खाण्या-पिण्याची चंगळ असलेला ऋतू मानला जातो. भूकही दाबून लागते, खाण्यासाठी व्हरायटीही उपलब्ध असते. परंतु, तरीही आरोग्याच्या दृष्टीने आहाराचा विचार करावा. बटाटा, पास्ता, ब्रेड या पदार्थाना आता बायबाय करा, त्याऐवजी ताजी फळं, भाज्या यांचे आहारातील प्रमाण वाढवा. हिवाळ्यात मिळणार्‍या गाजर, मटार, हरभरा, मुळा, नवलकोल, बीट व अन्य फळे-भाज्यांचं पदार्थ खा. हेल्दी सूप्सही प्यावेत. गाजर, हरभरे नुसते भाजूनही छान लागतात, त्याचा आस्वाद घ्या. कॅसेरोल (भाज्या बेक करून बनवितात ), स्टय़ू (सूप व भाजी यांचे एकत्रित व्हर्जन) हे पदार्थही ट्राय करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोड पदार्थाचं सेवन कमीत कमी करा. साखरेनं एनर्जी वाढते हे मान्य; परंतु तितक्याच लवकर ती डाउनही होते. पाण्याचं प्रमाण वाढवा आणि तेलाचं कमी करा.  डाळी, कडधान्यांनाही आहारात अग्रक्र मानं सहभागी करा. आहारावर आळस अवलंबून असतो, त्यामुळे हिवाळ्यात चोपून खाण्यापेक्षा संतुलित खा.6) अशक्तपणा आलाय का?

अ‍ॅनिमिया जुनाट आजार याचाही थकवा व झोपेशी, निरुत्साह याच्याशी संबंध असतो. फक्त हिवाळ्यातच नाही तर वर्षभर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर याबाबत योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. केवळ हिवाळ्यापुरताच असेल तर त्यासंदर्भातही वैद्यकीय मदत घेता येते.