शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

पहिल्यांदाच मत देणार, आणि?- इन्स्टावर टाकणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 13:08 IST

पहिल्यांदाच मत देणार, पहिल्यांदाच बोटाला शाई लागणार, मग काय करणार?

ठळक मुद्देऑक्सिजनच्या सर्वेक्षणाच्या निमित्ताने गप्पांचे फड रंगले, त्या गप्पांच्या गोष्टी!

-ऑक्सिजन

नव-मतदारांचा अभ्यास करण्यासाठी ‘लोकमत’ची टीम अख्खा महाराष्ट्र आणि गोवा पालथा घालत भटकली, तेव्हा अगदीच किरकोळ अपवादवगळता दिसलेलं चित्र एकच होतं र्‍‘निवडणूक? पॉलिटिक्स?- नो वे! मला त्यातलं काही कळत नाही, येट टू डिझाइड’- असं म्हणून प्रश्नावलीपासून पळणारेच बहुसंख्य ! निवडणूक आणि राजकारण या दोन शब्दांची एवढी का अ‍ॅलर्जी असं अनेकांना विचारलं तर ते सांगत, अजून ठरलं नाही मत कुणाला देणार !तुम्ही मत कुणाला देणार हे आम्ही विचारतच नाही, मत देताना तुम्ही काय विचार करता किंवा करणार आहात, या व्यवस्थेकडे कसं पाहता एवढंच बोलू असं सांगितल्यावर अनेकांचं ‘का-कू’ करणं संपलं. आणि मस्त गप्पांचे फड रंगले. त्यातून काही गोष्टी हाती लागल्या, त्या अशा.............

1.  मुलांपेक्षा मुली मोठय़ा उत्साहानं प्रश्नावली भरून देत होत्या. मात्र अनेकींनीच उलटा प्रश्न विचारला की, खरंच एका मतानं फरक पडतो का, आम्ही मत दिल्यानं काही फरक पडेल का?2. अनेकांनी मोकळेपणानं सांगितलं की, राजकीय व्यवस्थेवर आमचा म्हटलं तर विश्वास आहे, म्हटलं तर नाही. आपल्या व्यवस्थेवर विश्वास आहे, ती व्यवस्था चालवणार्‍या कुणावरच विश्वास राहिलेला नाही. आणि आदर? - तो तर कुणाविषयीच वाटत नाही. काही मुलांनी स्वच्छ सांगितलं की, पोलिटिशियन्स आर नॉट आवर आयकॉन, फरगेट आयडॉल ! राजकीय नेत्यांविषयी संपलेला आदर ही गोष्ट चर्चेत वारंवार ठळक होत गेली.3. या मुलांच्या जगण्यात जे कन्फ्युजन आहे, ते राजकीय मतांविषयीही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डावी विचारसरणी म्हणजे काय आणि उजवी विचारसरणी म्हणजे काय, हेच अनेकांना माहिती नाही. डावं-उजवं ही भानगडच त्यांच्या आयुष्यात नाही. त्या प्रश्नावर बहुसंख्य तरुणांची दांडी उडाली. 4.  ग्रामीण तरुणांपेक्षा शहरी मुलं जास्त गोंधळलेली होती. ग्रामीण भागातील तरुणांची राजकीय मतं ठाम आणि सामाजिक प्रश्नांची समजही जास्त चांगली दिसली. अडचणी जास्त असूनही राजकीय व्यवस्थेवर ग्रामीण तारुण्याचा विश्वास शहरी मुलांपेक्षा जास्त दिसला.5. व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठ झिंदाबाद अशीच सर्वत्र स्थिती. सगळ्यांना सगळ्या विषयांवर मतं मांडता येत होती. पण माहिती, तिची खातरजमा, आपल्यार्पयत आलेल्या फॉरवर्डची पडताळणी हे सारं कुणालाच महत्त्वाचं वाटत नव्हतं. त्याउलट व्हॉट्सअ‍ॅपवर जे फिरतं तेच खरं असं मानून हमरीतुमरीवर येणारेही अनेकजण भेटले.6. मतदान करणार का, या प्रश्नाचं उत्तर बहुतांश हो असं होतं; पण का करणार याचा काही विचारच केलेला नव्हता.  7. राजकीय नेतृत्वाकडून अपेक्षांचे डोंगर आहेत मात्र खासदार काय काम करतात, आणि नगरसेवक काय काम करतात, यातला साधा फरकही बहुतेकांना माहिती नव्हता.8. मत द्यायला जाणार का, या प्रश्नावर अनेक मुली गप्पच व्हायच्या ! सोबत असली तर, घरचे हो म्हणाले तर अशी उत्तरं ग्रामीण भागातच नाही तर शहरातही अनेकींनी दिली.  9. आपल्या मताला किंमत नसतेच याचा व्यक्तिगत आयुष्यातला अनुभव मुलींच्या वाटय़ाला अजूनही किती कडवटपणाने येतो आहे, हेही या पाहणीत स्पष्ट दिसलं. 10. पहिल्यांदाच मत देणार, पहिल्यांदाच बोटाला शाई लागणार यातला सगळ्यात मोठा आनंद कुठला? - या प्रश्नाला सगळ्यात जास्तवेळा मिळालेलं उत्तर होतं, इन्स्टावर टाकणार !