शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

आकाश कशाला? आपली उडाण त्यापुढची आहे..

By admin | Updated: June 23, 2016 16:42 IST

हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात डोनोविन लिव्हिंगस्टोन या विद्यार्थ्यानं केलेलं हे भाषण. ते इतकं गाजतंय सध्या की, हार्वर्ड फेसबुकपेजवर त्याला दहा कोटी व्ह्यूज मिळाले. पाच मिण्टाची ही आपली कविताच त्यानं सादर केली, आणि हिलरी क्लिंटनसह अनेकांनी ती सोशल साईट्सवर शेअर केली..

 हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात डोनोविन लिव्हिंगस्टोन या विद्यार्थ्यानं केलेलं हे भाषण. ते इतकं गाजतंय सध्या की, हार्वर्ड फेसबुकपेजवर त्याला दहा कोटी व्ह्यूज मिळाले. पाच मिण्टाची ही आपली कविताच त्यानं सादर केली,  आणि हिलरी क्लिंटनसह अनेकांनी ती सोशल साईट्सवर शेअर केली.. एका कृष्णवर्णीय तरुणानं आपलं भूत-भविष्य-वर्तमान उकलत आपल्या वेदनांसह स्वप्नांची केलेली ही गुंफण जगभरातल्या अनेक तरुणांना आपलीच आपबिती वाटतेय.. त्या कवितेचा हा संपादित, मुक्त अनुवाद.Education then, beyond all other devices of human origin, Is a great equalizer of the conditions of men." - Horace Mann, 1848. ए४िूं३्रङ्मल्ल ३ँील्ल, एकेकाळचं हे वाक्य, शिक्षणाची महती सांगणारं..पण त्या काळात मला कुठं लिहिता येत होतं?कुठं वाचता येतं होतं?तसं करायचा प्रयत्न केला असतातरी मरणच उभं राहिलं असतं समोरपिढ्यांपिढ्या आम्हाला माहिती होती ही ज्ञानाची सर्वोच्च ताकद,पण ज्ञानाच्या तिजोरीला टाळं ठोकणाऱ्यांनाआम्ही कधी, कुठं विचारलं की,कुठंय या कुलुपाची चावी?दुर्दैवानं या वाटेवर मी याहून भयंकर फाळण्या पाहिल्या,विजयाचं मत्त रुप पाहिलंशाळेच्या चौकोनी वर्गातउभ्या वाटण्या दिसल्या‘कोटा’ या नावाखाली किलकिली झाली काही दारं,पण तिथं शिकण्याचे आनंद कुठले?‘‘विविधता, सामीलकी’’हे दोन शब्द फक्त सतत वाजत राहिले..त्या दिवसात वाटायचं की, जंगली गुलाबाच्या काटेरी झुडपावरउमललेल्या फुलासारखा मी एकटाच,अन्यायाच्या काट्यासारखा..मी वाटोळा, बडबड्या, चळवळ्या,इतरांसाठी अडथळाच होतोमाझ्यातली ऊर्जा सगळ्या सीमाओलांडत सैरावैरा धावतच होतीमाझ्या चेतना-जाणिवांतून,तुमच्या अभ्यासाच्या, आकलनाच्याआणि दर्जाच्या पलीकडे होतं हे धावणंप्रेम आणि यातनांची एकस्पष्ट अभिव्यक्ती म्हणून उभा मीमाझ्या धमन्यांतच सळसळत होती क्रांतीमी एक स्वप्न, साकार व्हायला आसुसलेलं,माझा भूतकाळ, तो मला गप्प बसू देत नव्हता..माझा देह, माझं मनस्थिर असेलच कसं..शिक्षक म्हणून, आमच्यावर ओरडण्यापेक्षा, चिडण्यापेक्षाआणि आम्हाला बांधून घालण्यापेक्षा मोकळं सोडा,गरिबी आणि सुविधांची आबाळअज्ञान आणि धोरणांची वानवाया दोरखंडातून मुक्त करा आम्हाला..मी सातवीत होतो, माझ्या शिक्षिकामिस पार्कर एकदा मला म्हणाल्या,‘डोनोवन, आपल्या अंगात उसळणारीऊर्जा आपण चांगल्या कामासाठीही वापरू शकतो!’आणि त्यांनी मला व्यासपीठ दिलं, बोलू दिलं,माझ्या आवाजाला शब्द दिलेत्यांनीच सांगितलं की, आपल्या कहाण्याया आपल्यासाठीच पायऱ्या असतातताऱ्यांपर्यंत पोहचवणाऱ्या,त्या पायऱ्यांवर चढ आणि ओेंजळीत धर तारेअजून उंच जा, खूप उंचकाळजापासून साद घाल आणिउजळवून टाक सारं जग तुझ्या असीम ओढीनंशिकवा आम्हाला, पण शिकवायचं तरतुमच्याठायी गॅलिलिओसारखा संयम हवा.तुम्ही ठरवलं तर विखुरलेली सारी टिंबजोडत जोडत एक जिनिअस घडवू शकतामिट्ट अंधारात स्वत:साठीच ज्योत होऊन उजळणारा.तेव्हा जागे व्हा..आवाज होऊ दे बुलंदप्रत्येक मुलाच्या फाटक्या आभाळालातुम्ही उमेदीचे अस्तर लावत नाही तोपर्यंत काम करामाझ्या वर्गात कितीतरी दिवस मी फक्त एक काळा ठिपका होतो..सारं शोषून घेणारा, माझ्यातलाच प्रकाश साठवून ठेवणारा..पण गेले ते दिवसमी ही ताऱ्यांचा भाग झालो..तुम्हीही व्हा.. आपल्या मागून येणारे सारेही होतील..आपण सारे मिळून,उदात्ततेच्या ताऱ्यांची एक महान आकाशगंगाउजळवू शकतो..पुढच्या पिढ्यांसाठी..आकाशापर्यंत पोहचणं ही मंझील नाही,ती सुरुवात आहे,आपली उडाण त्याच्यापुढची आहे..-डोनोवन लिव्हिंगस्टोन( हार्वर्ड विद्यापीठ)अनुवाद- चिन्मय लेले