शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

नापास शिक्षणाचे आळशी बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 07:00 IST

एमबीए/एम.फील बीई/एमई/एम.कॉम/एम.ए./एम.एस्सी. यासारखं उच्चशिक्षण घेतलेले तरुणही शिपाई/सफाई कामगार/लिपिक पदासाठी या पदांसाठी अर्ज का करतात? ही त्यांची मजबुरी की सरकारी नोकरीचे आकर्षण? शिक्षण व्यवस्थेचा पराभव की तरुणांचा आळस?

ठळक मुद्देगवंडय़ांची गरच असताना स्थापत्य अभियंते बनविणे काय किंवा बस कंडक्टरची गरज असताना एम.फील बनविणे काय, याचा शेवट शोकांतिकेतच होणार.

-डॉ. सुनील कुटे

 

मागच्या महिन्यात अमेरिकेतली एक बातमी वाचनात आली. तेथील काही भागात तापमान उणे 10 इतके खाली आले. सगळीकडे बर्फाची चादर पसरली. रस्ते बर्फाने अच्छादले गेले. रस्त्यावरील बर्फ साफ करण्यासाठी दररोज सकाळी 3 वाजता बुलडोझर रस्त्यावर येतात. कारण काय तर सर्व नोकरी करणार्‍यांना सकाळी 6.30 वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये वेळेवर पोहचता यावे ! संपूर्ण देश सकाळी 6.30 वा. टेबलवर असतो, काम सुरू करतो, कामाप्रति त्यांची असलेली शिस्त व निष्ठा भावली.ही बातमी वाचत असतानाच दुसरीकडे एका बातमीने लक्ष वेधून घेतले.एमबीए, पीएच.डी., इंजिनिअर झालेले शेकडो तरुण होमगार्डच्या सरकारी नोकरीसाठी मुलाखतीला आले. अशाच प्रकारच्या बातम्या या आधीही वाचनात आल्या होत्या. एम.फील, पीएच.डी. झालेले तरुण तुरुंगात शिपायाच्या नोकरीसाठी, जलसंपदा कार्यालयात लिपिकाच्या नोकरीसाठी, महसूल खात्यात पट्टेवाल्याच्या नोकरीसाठी, इतकेच काय तर महानगरपालिकेत घंटागाडीवर सफाई कामगार म्हणून हजारोंच्या संख्येने मुलाखतीला येण्याचं प्रमाण अलीकडे वाढू लागले आहे.उच्चशिक्षण घेतल्यावर या तरुणांना अशा प्रकारच्या नोकर्‍यांसाठी अर्ज करून मुलाखतीला गर्दी का करावीशी वाटली? ही त्यांची मजबुरी की सरकारी नोकरीचे आकर्षण? हा शिक्षणव्यवस्थेचा पराभव की तरुणांची कामाप्रति असलेली निष्ठा, असे अनेक प्रश्न मनात डोकावतात. या प्रश्नांची चिकित्सा होणे या पिढीच्या भविष्यातील वाटचालीसाठीच नव्हे तर पुढील पिढीच्या शैक्षणिक भवितव्याबद्दलचे निर्णय घेण्यासाठीही आवश्यक आहे.सकाळी 6.30 वाजता कामावर पोहचता यावे म्हणून पहाटे 3ला बुडलडोझर रस्त्यावर येतात ही बातमी वाचताना मला उच्चशिक्षण देणार्‍या महाविद्यालयातील बहुसंख्य विद्याथ्र्याचे वर्तन डोळ्यासमोर येते. ते प्रचंड विसंगत असलयाचे जाणवते. पहाटे 6.30 सोडाच; पण महाविद्यालयात सकाळी 10 वाजताही बहुसंख्य विद्यार्थी तासाला वेळेवर येत नाहीत. याचे कारण उठायला उशीर झाला. उशीर का झाला याची सखोल चौकशी केल्यावर लक्षात येते की पहाटे 3 ला झोप लागली. पहाटे 3 र्पयत मोबाइल वा लॅपटॉपवर सिनेमा वा सोशल मीडिया सुरू होता.आणि मग सकाळी उशिरार्पयत जाग न येणारे हे तरुण पुढे जाऊन (डिग्रीनंतर)  सरकारी नोकरीच्या इतक्या प्रेमात का पडतात? त्यांच्या मुलाखतीत ‘देशाची सेवा’, ‘समाजाची सेवा’, ‘लहानपणापासूनची आवड’ अशी पाठ करून दिलेली पोपटपंची छापाची उत्तरे खरी की काही वेगळीच कारणे दडलेली आहेत याचा शोध घेतला असताना प्रचंड अस्वस्थता येते. या सर्व कारणांचे मूळ आजची शिक्षणव्यवस्था, पालकांची जडणघडण, तरुण-तरुणींची मानसिकता व परिस्थितीची मजबुरी यात दडलेली आहेत.शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे व हृदयाला भावनेकडे वळविणे हा कोणत्याही शिक्षणाचा मूळ हेतू असला पाहिजे. आजचे शिक्षण नेमके इथेच नापास झाले आहे.फास्ट फुडची आवड व व्यायामाचा अभाव यामुळे काम करण्यासाठी लागणारी ऊर्जा व स्टॅमिना तरुण पिढीत दिवसेंदिवस कमी होताना दिसतो. सरकारी नोकरीचे आकर्षण हे देशसेवेसाठी किंवा कामावरील निष्ठा अन् शिस्त यामुळे नसून तेथे ‘चिकटल्यावर’ मिळणार्‍या सुरक्षिततेविषयीचे आकर्षण आहे.स्टॅमिना गमावल्यामुळे आलेले शैथिल्यही सुरक्षितता शोधताना दिसत आहे. सरकारी कार्यालयामध्ये (काही सन्माननीय अपवादवगळता) काम केलेच पाहिजे असे नाही, वेळा पाळल्याच पाहिजे असे नाही, काम केले नाही तर पगार कापला जाईल असे नाही या सर्व कारणांमुळे स्थैर्य, सुरक्षितता व आराम यांच्या ओढीमुळे तरुण पिढीत आकर्षण आहे. त्याबदल्यात आपली पीएच.डी., पदव्युत्तर पदवी इ. यांचे अवमुल्यन होत आहे. याची त्यांनी खंतही नाही.ही खंत जशी तरुणांना नाही तशी शिक्षणव्यवस्थेतील धुरिणांनाही नाही. पदवीचा व शिक्षणाचा, आयुष्य जगण्याशी, समाजाशी आणि श्रमाशी संबंध तुटल्याने ही वेळ आली आहे. शिक्षणामुळे जीवन जगण्याचा आत्मविश्वास निर्माण होत नाही. शिक्षण व पदवीमुळे समाजाचे प्रश्न सुटण्याऐवजी शिक्षण व पदवी हाच समाजापुढील प्रश्न होण्याचे कारण म्हणजे शिक्षणाने श्रमापासून घेतलेली फारकत. यामुळेच आराम, स्थैर्य व सुरक्षितता याचे आकर्षण निर्माण होते. पहाटे 3 ला रस्ते मोकळे करण्यासाठी कामावर हजर होणे व सकाळी 10 वाजेर्पयत डोळा उघडणे या श्रमसंस्कृतीतला हा फरक आहे.अंगी असलेल्या क्षमतांचा विकास हे शिक्षणाचं ध्येय असलं पाहिजे. आयआयटीसारख्या नामांकित संस्थांतून अभियांत्रिकीची पदवी घेऊन कित्येक विद्यार्थी बॅँकेत, बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये वा आयुष्यात अभियांत्रिकी क्षेत्राशिवाय इतर काम करतात. हे कदाचित चूकही असेल; पण भविष्यकाळात अशा प्रकारचा बदल मोठय़ा प्रमाणात घडू शकेल. शिक्षणाने विकसित केलेल्या क्षमता ज्या विषयात शिक्षण घेतले त्याशिवाय इतरत्र वापरण्याचे प्रमाण वाढू शकेल. डॉ. जब्बार पटेल, डॉ. श्रीराम लागू, डॉ. काशीनाथ घाणेकर, अरुण दाते, मनोहर र्पीकर ही याची उदाहरणे आहेत. पण त्यांच्या बदलांमुळे पदवीचं किमान अवमुल्यन तरी झालं नाही. नवीन व्यवसायात त्यांनी ‘चिकटण्याचा’ व आयुष्य सार्थकी लागण्याचा अनुभव न घेता कठोर परिश्रम व मेहनतीने नवी उंची गाठली.कल्पक उद्योग-व्यवसाय सुरू करणार्‍या तरुण तरुणींच्या प्रेरक कथांची अनेक उदाहरणे ही खरं तर पदवीचे अवमूल्यन करणार्‍या उच्चशिक्षित तरुणांसाठी सांगता येतील. अंकिता बोस ही 27 वर्षाची युवती तिने मुंबईत शिक्षण पूर्ण करून झीलिंगो ही फॅशन व ई-कॉमर्सची कंपनी सुरू केली. अवघ्या चार वर्षात तिच्या याय स्टार्टअपे कंपनीला युनिकॉर्नचा दर्जा मिळाला. हा दर्जा मिळविण्यासाठी कंपनीची उलाढाल किमान 1 अब्ज डॉलर्स इतकी असावी लागते. अर्थात यासाठी 10 वाजेर्पयत झोपा काढण्याची प्रवृत्ती बाजूला ठेवून कठोर मेहनत व परिश्रमांची गरज लागते. उद्योजकता विकासाची कास धरावी लागते. अन् सुरक्षिततेचे कवच भेदून धोका पत्करण्याची तयारी लागते.असे तरुण-तरुणी परिस्थितीचा बाऊ न करता, पालकांचे मतपरिवर्तन करून त्यांची मानसिकता बदलून पदवीचे, शिक्षणाचे अवमूल्यन न करणारी सरकारी नोकरीच्या मागे न जाणारी झेप घेतात. अशी उदाहरणे कमी असली तरी त्यांचे प्रमाण वाढावे म्हणून श्रमाला व कौशल्याला प्रतिष्ठा देणारे अभ्यासक्रम सुरू करणे, तरुण-तरुणींनी आपला ‘कम्फर्ट झोन’ बाजूला मारून थोडा धोका पत्करून आपल्यातील क्षमता व आत्मविश्वासाचा वापर करून, पालकांच्या मानसिकतेत बदल घडवित आपल्या शिक्षणाचे अवमूल्यन न करता, नसत्या स्थैर्य सुरक्षिततेत न अडकता वेगळ्या वाटा धुंडाळण्याची साद काळ घालतो आहे. काळाच्या ओघात टिकण्यासाठी उच्चशिक्षित तरुणांच्या प्रतिसादाची गरज वर्तमान मागतो आहे. असं घडलं तर येणारा भविष्यकाळ निश्चित उज्ज्वल असेल.

*** 

व्यवहारज्ञान शून्य !

आजच्या अभ्यासक्रमात व्यवहारात उपयोगी पडेल असे ज्ञान अंतभरूत नसल्याने पदवी मिळते; पण ज्ञान मिळत नाही. त्यामुळे ही पिढी काहीही करून मिळेल ती नोकरी पदरात पाडून घेण्यासाठी व त्यातल्या त्यात सरकारी नोकरीसाठी धडपडताना दिसते. दुर्दैवाने बहुसंख्य सरकारी खात्यात अशा ज्ञानविरहित पदवीधारकांना पोषक वातावरण असते. आयती पदवी कशी मिळवली आहे, आपले व्यवहार ज्ञान किती आहे, आपले मूल्य काय आहे. याची उमेदवारांना चांगलीच कल्पना असते त्यामुळे उच्चशिक्षण घेऊनही ते शिपायाच्या जागेसाठी, तेथील सुरक्षिततेसाठी धडपडताना दिसतात. भले त्यांना तेथे नोकरी मिळत असेलही व त्यात त्यांना समाधान मिळेलही; पण शैक्षणिक पदवीचे मूल्य त्यामुळे कमी होते याची खंत शिक्षण क्षेत्रातल्या नियोजनकर्त्यांना  नाही.

गरज कुणाची?अनुत्पादक क्षेत्रातल्या निर्थक पदव्या बंद करून रोजगारभिमुख कौशल्याधारित पदव्या जोर्पयत सुरू होत नाहीत तोर्पयत आजच्या पदवी व पदवीधारकांचं अवमूल्यन सुरू राहील. गवंडय़ांची गरच असताना स्थापत्य अभियंते बनविणे काय किंवा बस कंडक्टरची गरज असताना एम.फील बनविणे काय, याचा शेवट शोकांतिकेतच होणार.

धोका कोण पत्करेल?

ज्यांच्याकडे अशा मेहनतीची, चिकाटीची आणि जिद्दीची तयारी असते ते शिपाई वा घंटागाडी ऐवजी व्यवसायातही पदार्पण करु शकतात. खरं म्हणजे आपल्याकडे उद्योजकता विकासाकडे पालक व पदवीधारक विद्यार्थी खुपच दुर्लक्ष करतात. आपल्या 120 कोटी लोकसंख्येच्या हजारो गरजा भागविण्यासाठी हजारो कंपन्या विदेशातून इथलं मार्केट काबीज करायला येतात. पण आपले तरुण उद्योजकता विकासाऐवजी पैसे भरुन नोकरीच्या शक्यता आजमावत फिरतात. पालकांचे पाठबळ, बँकेचे कर्ज व स्वतर्‍ची धडाडी आणि शिक्षणातून झालेल्या क्षमतांचा विकास याच्या जोरावर तरुणांनी आता व्यवसायाकडे, उद्योगांकडे वळलं पाहिजे. पालकांनीही मानसिकता बदलुन तरुणांना प्रोत्साहान देणं ही काळाची गरज आहे. शासनाचे स्टार्टअप धोरणही या दृष्टीने नोकरीमागे न धावता स्वतर्‍च्या नवनवीन कल्पनांना प्रोत्साहन देणारे आहे.

(लेखक नाशिकस्थित क.का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था येथे अधिष्ठाता आहेत.)