शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

तो आणि ती, असे का वागतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:18 IST

प्रत्येकाला, अमुक एक व्यक्ती अशी का वागते याबद्दल कुतूहल नक्कीच असतं. आणि विशेषत: ती व्यक्ती तुमची बायको, गर्लफ्रेण्ड, नवरा किंवा बॉयफ्रेण्ड असेल तर ती नक्कीच असेल.

- प्रज्ञा शिदोरेप्रत्येकाला, अमुक एक व्यक्ती अशी का वागते याबद्दल कुतूहल नक्कीच असतं. आणि विशेषत: ती व्यक्ती तुमची बायको, गर्लफ्रेण्ड, नवरा किंवा बॉयफ्रेण्ड असेल तर ती नक्कीच असेल. आणि तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवरचे खासकरून टिपिकल बायकांच्या किंवा पुरुषांच्या वागण्याबद्दलचे विनोद ऐकायला आवडत असतील ना? कुठेही कुजबुजलं तरी तिला बरोबर कसं ऐकू येतं किंवा ती किती जास्त बोलते, तो किती वेंधळा आहे, गाडी चालवताना त्याला पत्ता विचारायला कसा आवडत नाही, वगैरे? किंवा तुम्हीही असं जेण्डर स्टिरिओटायपिंग सहज जाता जाता करतही असाल. हे बोलणं स्त्रीवादाच्या अगदीच विरोधात आहे; पण बायका आणि पुरुष यांच्या स्वभावामध्ये काही मूलभूत फरक ते असतात. अर्थात हे जगातल्या प्रत्येक बाई किंवा पुरुषाबद्दल खरं असेल असं नाही; पण हे जैविक फरक, हे दोन लोकं एकमेकांशी आणि जगाशी कसा व्यवहार करतात कशा प्रतिक्रि या देतात हे ठरवतात, असं अ‍ॅलन आणि बार्बरा पेसे म्हणतात.आणि हा फरक कसा आहे, हे दाखवण्यासाठी त्यांनी हे अख्खे पुस्तकंच लिहिले. व्हाय मेन डोण्ट लिसन अ‍ॅण्ड विमेन काण्ट रिड मॅप्स. अ‍ॅलन आणि बार्बरा हे जोडपं आॅस्ट्रेलिया इथे राहणारं. अ‍ॅलन याने सायकॉलॉजी, न्यूरोसायन्स आणि सायकियाट्री या विषयांमध्ये शिक्षण घेतलं आणि मग तो मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून काम करत होता. बार्बरा हीसुद्धा याच क्षेत्रामधली. त्यांना व्यवसायात येणाऱ्या अनुभवांवरून त्यांनी हे पुस्तक पुढे आणलं.अर्थात, या पुस्तकात त्यांचे अनुभव आणि जे तर्क त्यांनी लावले आहेत, ते शास्त्रीय आहेत असं ते अजिबात म्हणत नाहीत; पण, ‘आहे ते आहे !’ आणि हे आपण सगळेच अनुभवतो, असं त्यांचं म्हणणं आहे.म्हणून जर अशास्त्रीय विधानांचा त्रास तुम्हाला होणार नसेल, आणि जर तुम्हाला इतरांची स्वभाववैशिष्ट्ये समजून घ्यायची असतील तर हे पुस्तक नक्कीच वाचा!why men cant listen & women cant read mapsअसा सर्च मारला तर अ‍ॅलन आणि बार्बराच्या भाषणाचे अनेक व्हिडीओही पाहता येतील.