शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

सुरक्षित गर्भपाताचा अधिकार का नाकारता? मोरोक्को  आणि  अमेरिकेतील  युवतींचा  सवाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 3:16 PM

कुठं मोरक्को कुठं अमेरिका मात्र या दोन्ही जगात आता गर्भपात या विषयावरून भयंकर वाद सुरू आहेत.

ठळक मुद्देगर्भपाताचा सुरक्षित अधिकार तरुणींना नसावाच असं म्हणत कायद्याचा बडगा उगारला जातोय.

- कलीम अजीम

गर्भपात बंदी. गेल्या आठवडय़ात गर्भपातबंदी कायद्यासंदर्भात घडलेल्या दोन घटनांनी जगाचं लक्ष वेधलं. पहिली घटना मोरक्कोमधली. त्यात हजारा रायसोनी नावाच्या एका महिला पत्रकाराला अवैध गर्भपात केल्याचा आरोप ठेवून शिक्षा सुनावण्यात आली. दुसर्‍या घटनेत अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात गर्भपाताचे नियम अधिक कठोर करणार्‍या ‘हार्टबीट’ विधेयकामुळे वादळ उठलं.आपल्यापासून बरंच लांब आहे हे जग तसं; पण बंदी आणि सक्ती काय करू शकतात वैयक्तिक जगण्यात याची उदाहरणं आहेत.म्हणून हे माहीत असणं गरजेचं आहे.मोरक्को हे उत्तर आफ्रिकेतलं एक मुस्लीम राष्ट्र. हजारा रायसोनी ही तिथली धडाडीची पत्रकार. सरकार व यंत्रणेविरोधात बातम्या देण्यासाठी ती प्रसिद्ध आहे. 28 वर्षीय हजारा अरबी वृत्तपत्र ‘अखबार अल यौम’मध्ये काम करते. ती राजधानी राबत येथे तिच्या प्राध्यापक जोडीदारासह राहते. त्यांचं लगA ठरलेलं आहे. मात्र ऑगस्टमध्ये तिच्यावर पाळत ठेवून तिला अटक करण्यात आली. तिचा गुन्हा काय तर ती  नियोजित जोडीदारासह स्रीरोगतज्ज्ञांच्या क्लिनिकमधून बाहेर पडताना दिसली.अवैधरीत्या गर्भपात करणार्‍या काही क्लिनिकवर मोरक्कन सरकारची नजर होती. हजारा उपचारासाठी गेली ते त्यातलंच क्लिनिक होतं. अटक केल्यानंतर हजाराने तुरु ंगातून पत्र लिहून सर्व आरोप खोटे व निराधार असल्याचं सांगितलं. तिचं म्हणणं आहे की, तिला गर्भधारणा झालीच नव्हती तर गर्भपात कसा करणार? तिने सरकारी यंत्रणांवर भेदभावाचा आरोप लावला आहे. ती म्हणते की, सरकार तिच्यावर नाराज आहे. कारण, ती सरकारविरोधी भूमिका घेणार्‍या संस्थेत काम करते. हजारा रायसोनीवर अवैधरीत्या गर्भपात केल्याच्या खटला भरण्यात आला. या प्रकरणी 1 ऑक्टोबरला राजधानीमधील राबत कोर्टाने निर्णय देत शिक्षा सुनावली. हजारा व तिच्या जोडीदाराला एक वर्ष तर डॉक्टरला दोन वर्षाच्या शिक्षेचा आदेश काढला. कोर्टाने नर्सला दोषी ठरवून तिला निलंबित केलं.हजाराच्या वकिलाने निकालाला सर्वोच्च कोर्टात आव्हान देणार असल्याचं म्हटलं आहे, तर दुसरीकडे देशात हजाराच्या समर्थनार्थ मोठय़ा संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत. हजारा व तिच्या जोडीदाराला अटक केल्यापासून मोरक्कन नागरिक सरकारच्या या घटनेचा निषेध करत ‘फ्री हजारा’ मोहीम राबवत आहेत. कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर मोरक्कन लोक आंदोलन करतच आहेत.हजाराच्या निमित्ताने मोरक्कोत गर्भपातबंदी कायदा शिथिल करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. हजारो लोकांनी रस्त्यावर येत गर्भपात हक्काचं समर्थन करत आहेत. सुरक्षित गर्भपात हा प्रत्येक स्रीचा मूलभूत हक्क आहे तो मिळालाच पाहिजे अशी स्थानिकांची मागणी आहे.मोरक्कोत आईचा जीव धोक्यात असेल किंवा लैंगिक अत्याचारातून स्री गर्भवती राहिल्यास सुरक्षित गर्भपाताला परवानगी आहे. मात्र अन्यवेळी गर्भपाताचे कायदे कडक आहेत.**दुसरीकडे अमेरिकेसह युरोप खंडात सुरक्षित गर्भपाताची मागणी जोर धरत आहे. अमेरिकेत जॉर्जिया राज्यात 6  आठवडय़ानंतर गर्भपाताला परवानगी नाकारणारं ‘हार्टबीट बिल’ हा कायदा नुकताच लागू झालेला आहे. अमेरिकेतील 50 राज्यांत गर्भपातबंदीचा कठोर कायदा अमलात आहे. हे नियम शिथिल करावेत, अशी मागणी करत जॉर्जियामध्ये लोक रस्त्यावर उतरले होते. सुरक्षित गर्भपाताच्या हक्काच्या लढय़ाला अमेरिकेत दोन शतकाचा दीर्घ इतिहास आहे. हार्टबीट विधेयकानंतर अमेरिकेमध्ये सुरक्षित गर्भपाताचा हक्क मागणार्‍या व्यापक चळवळीची आखणी सुरू असल्याचं माध्यमांनी नमूद केलं आहे.गर्भपातावर बंदी आणि न करण्याची सक्ती यावर अशी विकसित आणि अविकसित देशातही एकसमान चर्चा होताना दिसते आहे.